शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा विकणाऱ्यास अटक; मांजा असलेल्या ७ फिरक्या, ४६ रिळ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:58 IST

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई. "भारत पतंगवाला"  या दुकानात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार शहानिशा करून छापा टाकला.  

 ठाणे: पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या नायलॉनचा मांजा (दोरा), व ज्या माजांस काचेची कोटींग आहे, त्याची विक्री साठा व वापर यावर बंदी घालण्यात आली असताना, नायलॉन मांजा याची विकणाऱ्यास ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून वेगवेगळ्या रंगाच्या नायलॉन मांजा असलेल्या ०७ लाकडी फिरक्या, ४६ रिळ असा एकूण १४ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 उल्हासनगर १,गोल मैदान येथील "भारत पतंगवाला"  या दुकानात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार शहानिशा करून छापा टाकला.   तर बॅरेक नं. ७१६, रूम नं. १०.११, हॉस्पीटल एरीया, उल्हासनगर ३ येथील रहिवासी व दुकानदार बुरो डोलनदास वासवानी (४८) हे प्रतिबंधीत नायलॉन मांजा (दोरा) ची विक्री करीत असतांना मिळून आले. त्यावेळी त्याचेकडून वेगवेगळ्या रंगाच्या नायलॉन मांजा (दोरा) असलेल्या ०७ लाकडी फिरक्या, व ४६ रिळ असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम १८८, २९०,२९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उल्हासनगर पोलीस स्टेशन करीत आहे.बही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उनिरीक्षक थॉमस डीसोझा पोलीस हवालदार संजय बाबर, कल्याण ढोकणे, पोलीस नाईक  संजय राठोड, भगवान हिवरे या पथकाने केली  डोंबिवलीतही जप्त केले १६ रीळठाणे: कल्याण गुन्हे शाखेनेही विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली, महात्मा फुले रोड येथील शिवाजी धर्मा जाधव (५२)  यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्यांच्याकडील ८हजार रूपये किंमतीचे नायलॉन मांजा असलेले एकुण १६ रोल जप्त केले. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा (दोरा) बाळगून विक्री करीत असताना मिळून आल्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक भुषण एम. दायमा, पोलीस उपनिरीक्षक  मोहन कळमकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस हवालदार माने, जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जरग, राठोड या पथकाने केली.