शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

नर्स आहे की वैरीण! ८ मुलांचा जीव घेऊन १० चिमुरड्यांच्या हत्येचा केला प्रयत्न 

By पूनम अपराज | Updated: November 12, 2020 17:32 IST

Murder : याप्रकरणी चेशाइर पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्यांचा कट रचणे या कलमांतर्गत नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

ठळक मुद्देलिव्हरपूलच्या दक्षिणेकडील काऊन्टर ऑफ चेस्टर हॉस्पिटलच्या नवजात बालकांच्या युनिटमध्ये झालेल्या मृत्यूच्या तपासणीनंतर 30 वर्षीय नर्स ल्युसी लेबीवर आरोप लावण्यात आले असल्याचे चेशाइर पोलिसांनी सांगितले. 

लंडन - सध्या जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होत असताना कोरोनायोद्धा म्हणून नावाजल्या जाणाऱ्या डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी नर्स. मात्र, नर्स पेशाला युके हॉस्पिटलमध्ये काळिमा फासणारी घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये जून २०१५ ते २०१६ दरम्यान  एका नर्सने चक्क ८ मुलांचा जीव घेतला तर १० मुलांच्या हत्येचा कट रचत होती. याप्रकरणी चेशाइर पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्यांचा कट रचणे या कलमांतर्गत नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

 

लिव्हरपूलच्या दक्षिणेकडील काऊन्टर ऑफ चेस्टर हॉस्पिटलच्या नवजात बालकांच्या युनिटमध्ये झालेल्या मृत्यूच्या तपासणीनंतर 30 वर्षीय नर्स ल्युसी लेबीवर आरोप लावण्यात आले असल्याचे चेशाइर पोलिसांनी सांगितले. मे २०१७ मध्ये पोलिसांनी अनेक बाळांच्या मृत्यूचा तपास सुरू केला. लेबी हिला मंगळवारी तिसऱ्यांदा अटक करण्यात आली. यापूर्वी तिला 2018 आणि 2019 मध्ये अटक करण्यात आली होती आणि प्रत्येक वेळी पुढील चौकशी प्रलंबित ठेवली. यूकेच्या चेस्टर हॉस्पिटलमध्ये २०१५ आणि २०१६ सालादरम्यान अनेक मुलांचा संशयास्पद मृत्यू होत होता. हृदय किंवा फुफ्फसं निकामी झाल्यामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचं निदान होत होतं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या मुलांच्या हाता-पायावर वेगळ्याच प्रकारच्या छोट्याच्या जखमा सापडत होत्या. 

ल्यूसीने या आधी लिव्हरपूल वूमेन्स हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिने चेस्टर हॉस्पिटलमध्ये नोकरी पत्करली. २०१३ साली तिच्या युनिटमधील २ मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये ती संख्या ८ वर गेली होती. त्यानंतर पुन्हा ५ मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे ल्यूसीबद्दल पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पोलीस याचा अधिक तपास सध्या करत आहेत.  

टॅग्स :MurderखूनLondonलंडनPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल