शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: रेव पार्टीत जाऊ नाही शकला, पण तरीही NCBच्या जाळ्यात फसला; आर्यनच्या मित्राला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:11 IST

Aryan Khan Drug Case: एनसीबीकडून आतापर्यंत ९ जणांना अटक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत काल ८ जणांना अटक केली. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्यन खानला आज एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं. त्याला ७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आर्यनला जामीन मिळवण्यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदेंनी त्यांचा अनुभव पणाला लावला. मात्र जामीन मिळवण्यात ते अपयशी ठरले.

एनसीबीनं क्रूझवरून ८ जणांना अटक केली. यानंतर आता या प्रकरणात नववी अटक झाली आहे. एनसीबीनं आर्यन खानचा मित्र श्रेयस नायरला गोरेगावातून बेड्या ठोकल्या. श्रेयसकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या चौकशीतून श्रेयसचं नाव समोर आलं. आर्यनसोबत अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एसबीच्या वकिलांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्याची मागणी केली होती.

कोण आहे श्रेयस नायर?क्रूझवर ड्रग पार्टी केल्याप्रकरणी काल एनसीबीनं आठ जणांना अटक केली. आता याच प्रकरणात श्रेयसला अटक करण्यात आली. श्रेयस हा आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा अतिशय जवळचा मित्र आहे. श्रेयसचं नाव आर्यन आणि अरबाजच्या मोबाईलमधील चॅटिंगमधून समोर आलं. एनसीबीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस क्रूझवरील रेव पार्टीला जाणार होता. मात्र तो जाऊ शकला नाही. ते पार्टीला का जाऊ शकला नाही, यामागाचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो