शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

मुंबईतून बेपत्ता झालेल्या 126 मुलींचे गूढ कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

७०८ जणींचे अपहरण : ५२८ मुलींचा लागला शेाध 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतून गेल्या ११ महिन्यात ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ५८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात १२६ मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

एनसीआरबीच्या २०१९च्या अहवालानुसार, राज्यभरातून ५६ हजार ७५० पुरुष आणि ६७ हजार ७४६ महिला आणि १९ तृतीय पंथी असे एकूण १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. त्यापैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यास यश आले. यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक होते.

अशात मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवाऱीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेबर अखेरपर्यंत ७०८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने याप्रकरणी अपहरणाची नोंद करत अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ५०८ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहेत. 

२०१९ मध्ये १२४० मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी १०७६ मुलींचा शोध घेण्यास यश आले. याचबरोबर तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होण्याच्या घटनाही डोके वर काढत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग पथक कार्यरत आहेत. हे मिसिंग व्यक्तीसाठी कार्यरत आहेत.

पालक ओरडले म्हणून सोडले घर बऱ्याच प्रकरणात मोबाइलचा अतिवापर, गेम, अभ्यास न करणे, शिवाय क्षुल्लक कारणातून पालक ओरडले म्हणून घर सोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  तर काही प्रकरणात प्रेम प्रकरण, फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.