शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पतीनं पत्नीला चालत्या लोकलमधून ढकललं; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

By कुणाल गवाणकर | Updated: January 14, 2021 19:13 IST

चेंबूर-गोवंडी स्थानकांदरम्यानची घटना; आरोपी पती अटकेत

मुंबई: एका २६ वर्षीय महिलेला तिच्या पतीनं लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडली आहे. महिला लोकलच्या दरवाज्यात उभी असताना तिच्या पतीनं तिला धक्का दिला. चेंबूर-गोवंडी दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. लोकलमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेनं हा प्रकार पाहिला. तिनं याची माहिती पोलिसांना दिल्यानं पतीला अटक झाली.पतीनं पत्नीला लोकलमधून ढकलून दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'अटकेत असलेला आरोपी ३१ वर्षांचा असून तो त्याच्या पत्नीसोबत मानखुर्दमध्ये वास्तव्यात होता. ते दोघेही मजुरी करायचे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. सोमवारी लोकलमधून प्रवास करत असताना आरोपीनं पत्नीला खाली ढकललं. त्यावेळी महिलेची ७ वर्षांची मुलगी त्यांच्यासोबत होती. ती मुलगी तिला पहिल्या पतीपासून झाली होती,' अशी माहिती पोलिसांनी दिली.लोकलमधून प्रवास करताना महिला दरवाज्याजवळ उभी होती. ती दरवाज्यातून थोडीशी वाकली. त्यावेळी तिला पतीनं धरलं होतं. मात्र त्यानं अचानक तिला सोडून दिलं. त्यामुळे ती चालत्या लोकलमधून खाली पडली. हा प्रकार लोकलमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेनं पाहिला. तिनं याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लगेचच आरोपीला अटक करण्यात आली.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या. पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तिचा मृत्यू झाला. सध्या महिलेचा पती अटकेत आहे. त्यानं अंमली पदार्थांचं सेवन करून हे कृत्य केलं का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या ७ वर्षीय मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवलं आहे.