शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या अपहरण, बलात्कार प्रकरणी आई व मुलासह साथीदारास अटक

By धीरज परब | Updated: April 17, 2023 23:00 IST

दानिश वर तरुणीच्या फिर्यादीवरून साकिनाका पोलीस ठाण्यात ३ एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका २८ वर्षीय तरुणीचे अपहरण, बलात्कार प्रकरणी आई व मुलासह त्याच्या साथीदारास नवघर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीची वांद्रे येथून सुखरूप सुटका केली आहे. 

भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अश्विनी ( नाव बदलले आहे ) नावाच्या २८ वर्षीय तरुणीचे दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून अपहरण केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. ती वडिलां सोबत पायी घरी जात असताना ही घटना घडली होती. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तरुणीच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली. तांत्रिक विश्लेषण द्वारे तपास करत वांद्रे भागातून तरुणीची सुटका केली. तिचे अपहरण करणाऱ्या  दानिश अब्दुल शेख (२८) व त्याचा साथीदार चिराग शेखनूर शेख (३१) दोघेही रा. रझाक चाळ, जरीमरी, कुर्ला यांना अटक केली.  दानिश याने तिला गुंगीचे औषध पाजून तिच्या सोबत अश्लील फोटो काढून तिला धमकावून नवी मुंबई भागात बलात्कार केल्याचे व तिच्याशी बळजबरीने निकाह करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले. या प्रकरणात सहभागी दानिशची आई अफसाना अब्दुल शेख हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. 

दानिश वर तरुणीच्या फिर्यादीवरून साकिनाका पोलीस ठाण्यात ३ एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी हद्दीच्या कारणावरून विलंब करत दानिश याला वेळीच अटक केली नसल्याने त्याने तिचे रविवारी रात्री अपहरण करून नेल्यावर देखील तिच्यावर बलात्कार केल्याचे सकृतदर्शनी समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.