शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करताय पण सावधान; धुमस्टाईलने गळयातील ऐवज केले जातायत लंपास

By प्रशांत माने | Updated: August 22, 2022 15:48 IST

कल्याण डोंबिवली जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक येत असतात.

प्रशांत माने

डोंबिवलीः येथील ठाकुर्लीतील ९० फिट आणि कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर एकटे फिरणे धोकादायक झाले आहे. शनिवारी सकाळी एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना तीला धक्का देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन खेचून दोन तरुणांनी धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना रेल्वे समांतर रस्त्यावर घडली आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 

कल्याण डोंबिवली जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक येत असतात. हीच संधी साधत गेल्या काही महिन्यांपासून  चोरटयांकडून दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळयातील ऐवज लांबविण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शनिवारी  सकाळी याच परिसरात राहणारी महिला या रस्त्याच्या बाजुकडील पदपथावरुन  मॉर्निंग वॉक करत होती. याच दरम्यान दोन तरुण दुचाकीवर महिलेच्या मागावर होते. या मधील एक तरुण दुचाकीवरून खाली उतरला त्याने पदपथावरुन चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन हिसकावली व त्यानंतर दोन्ही तरुणांनी बाईक वर धूम ठोकत कल्याणच्या दिशेने पलायन केले. सोनसाखळी चोरीच्या घटनांसह येथील म्हसोबा चौकातील रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी देखील चोरीला जात आहेत. हे एकूणच चोरीचे प्रकार पाहता इथे पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.