शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मोलकरणीने मारला २० लाखांचा डल्ला; तब्बल १२ वर्षांपासून रोज चोरले पैसे, दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:04 IST

घरकाम करताकरता घरातील पैसे, चांदीच्या वस्तू आदी २० लाखांची चोरी घरकाम करणाऱ्या महिलेने केल्याचा खळबळजनक प्रकार नवघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

मीरा रोड : घरकाम करताकरता घरातील पैसे, चांदीच्या वस्तू आदी २० लाखांची चोरी घरकाम करणाऱ्या महिलेने केल्याचा खळबळजनक प्रकार नवघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एकाच ठिकाणी काम करणाºया व १७०० रुपये पगार मिळणाºया महिलेकडून दागिने, रोख, एफडी मिळून २० लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.भार्इंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील भाईदया ही जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तिसºया मजल्यावर ममता विष्णू चांगोलीवाला या राहतात. त्या गृहिणी असून पतीचा कपड्यांचा व्यवसाय आहे, तर मुलगी कॉलसेंटरमध्ये काम करते. त्यांना एका सदनिकेचे भाडेही येते. आलेले पैसे वा खरेदी केलेली चांदी हे कपाटात ठेवताना त्याची नेमकी किंमत वा संख्या नोंद करून ठेवत नसत. चांगोलीवाला यांच्या घरी १२ वर्षांपासून त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी अपर्णा भरत पवार (४६) ही घरकाम करत होती. शेजारीच राहणारी व इतक्या वर्षांपासून काम करणाºया अपर्णानेही चांगोलीवाला कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, त्यांच्या घरातून रोख व चांदीची बिस्किटे चोरीला जात होती. पण, त्यांना ते लक्षात येत नव्हते.ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चांगोलीवाला कुटुंबीयांना अपर्णावर जराही संशय नव्हता. परंतु, पोलिसांनी अपर्णाची माहिती घेण्यास सुरुवात केली. वन रूम किचनमध्ये अपर्णा, तिचा पती व मुलगी तसेच दिराचे कुटुंब राहते. अपर्णाही फक्त चांगोलीवाला यांच्याच घरी काम करते.घबाड पाहून पोलीसही झाले थक्कघर चालवताना चणचण होत नसल्याचे व तिच्या एकूणच राहणीमानावरून दिसत नसल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्या घराची झडती घेतली असता तीन लाख ४७ हजार ७०० रुपयांची रक्कम व नव्याने केलेले सहा लाख किमतीचे २२ तोळे सोने सापडले.शिवाय, बँकेत पाच लाख ३३ हजार रुपये तर फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले सहा लाख रुपये आढळले. अपर्णाकडे मिळालेले हे घबाड पाहून चांगोलीवाला कुटुंब व पोलीसही थक्क झाले.गुरुवारी अपर्णाला अटक केली असून ४ सप्टेंबरपर्यंत तिला पोलीस कोठडी मिळाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून आपण रोख व चांदी चोरत होतो. त्या पैशांतूनच सोन्याचे दागिने बनवल्याची कबुली तिने दिली आहे.