शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गो-तस्करीच्या आरोपावरून मध्य प्रदेशात जमावाचा हल्ला; महाराष्ट्रातील एक जण मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 07:03 IST

नर्मदापुरमचे पोलीस अधीक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात गायींना घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्यात आला होता.

नर्मदापुरम (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यात गो-तस्करीच्या आरोपावरून एका जमावाने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले, अशी माहिती  पोलिसांनी दिली.

नर्मदापुरमचे पोलीस अधीक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात गायींना घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्यात आला होता. त्यातून तीन जण गायींची बेकायदा वाहतूक करीत होते. १०-१२ लोकांच्या जमावाने ट्रक रोखून तीन जणांना बेदम मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले. पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेले. तेथे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना  अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो जखमी झालेला आहे. नजीर अहमद असे मृताचे नाव असून, शेख लाला व मुश्ताक अशी जखमींची नावे आहेत. (वृत्तसंस्था) 

चालकाचा दावा... शेख लाला हा ट्रक चालवत होता. त्याने सांगितले की, नर्मदापुरम जिल्ह्यातील नांदेरवाडा गावातून गायी अमरवतीमध्ये नेत असताना गावकऱ्यांनी वाहन रोखले. गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा त्याने इन्कार केला व गायी बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. त्याच्या ट्रकमध्ये ३० गायी आहेत, असेही त्याने सांगितले.