शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कारेमाेरेंना अटक व जामीन; ३१ डिसेंबरचे पोलीस ठाण्यातील शिवीगाळ प्रकरण भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 08:41 IST

३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/मोडाडी  : माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली. मोहाडी न्यायालयापुढे हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन काेठडी सुनावली. सायंकाळी जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन दिला.

३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. दरम्यान, रविवारी पत्रकार परिषद घेत या प्रकाराबद्दल त्यांनी माता-भगिनींची माफीही मागितली हाेती. साेमवारी भंडारा येथे चाैकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. मोहाडी न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर जिल्हा न्यायालयात तात्काळ जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. त्यावर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांची सुटका झाली.

तगडा पाेलीस बंदाेबस्तन्यायालय परिसरात तगडा पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला आहे. माेहाडी ठाण्यासमाेर नागरिकांची माेठी गर्दी झाली हाेती. ही कारवाई पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. भंडारा ठाण्यात उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील, उपविभागीय पाेलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्यासह मोठा फौजफाटा हाेता.