शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  भिसी-लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:17 IST

भिसी आणि लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेने दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. तपासात १५ जणांना जवळपास २ कोटी रुपयांनी फसविल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देव्यापारी बंधूंना अटक : अनेक नागरिक झालेत शिकार, सदर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिसी आणि लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेने दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. तपासात १५ जणांना जवळपास २ कोटी रुपयांनी फसविल्याची माहिती आहे.नागपुरात सुरू असलेल्या भिसीच्या रॅकेटची माहिती या घटनेमुळे उजेडात आली आहे. आरोपी कश्मिरी गल्ली, पाचपावली येथील रहिवासी हरप्रीतसिंह ऊर्फ चिंटू गुरुमितसिंह अलघ आणि त्याचा भाऊ गमनप्रीतसिंह उर्फ बिन्नी इकबालसिंह अलघ हे आहेत. अलघ बंधू अनेक दिवसांपासून भिसीच्या व्यवसायात आहेत. ते व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्युशन स्कीम आणि मासिक लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करीत होते. या स्कीमच्या माध्यमातून नागरिक त्यांच्याशी जुळले होते. कडबी चौक येथील रहिवासी हरविंदरसिंह नरुलांसह अनेक नागरिकांनी अलघ बांधवांकडे गुंतवणूक केली होती. नरुला यांनी एप्रिल २०१६ पासून अलघ बंधूंकडे व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्यूशन स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरू केले होते. या स्कीममध्ये भिसीच्या धर्तीवर नागरिकांना वेगवेगळ्या वेळी रक्कम मिळणार होती. नरुला यांनी एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान गुंतवणूक केली. त्यांना ८ लाख २० हजार रुपये मिळणार होते. नरुलांनी २०१८ मध्ये पैसे परत मागितल्यानंतर अलघ बंधंूनी ही रक्कम मंथली लकी ड्रॉ स्कीमध्ये ट्रान्सफर केल्याची बतावणी केली. त्यांनी नरुलांना मंथली लकी ड्रॉ स्कीममध्ये मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. मंथली लकी ड्रॉ स्कीमचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नरुला यांनी पैसे मागणे सुरू केले. परंतु त्यानंतरही अलघ बंधू टाळाटाळ करू लागले. नरुलांसह अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींकडे व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्यूशन स्कीम आणि मंथली लकी ड्रॉ स्कीम अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. नरुलांसारखेच आरोपी सर्वांनाच टाळाटाळ करीत होते. खूप दिवसांपासून त्रस्त झाल्यामुळे नागरिकांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या हप्ता वसुली प्रतिबंधक पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात १५ नागरिकांची दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे पोलिसांनी नरुलांच्या तक्रारीवरून आरोपी अलघ बंधूंना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करून १६ मार्चपर्यंत ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू आहे. पीडितांनी पाचपावली ठाण्यातही तक्रार केली होती.पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे गुंतवणूकदार शांत झाले होते. आरोपी आपली मोठी रक्कम नागरिकांकडे बाकी असल्याचे सांगत आहेत. ही रक्कम मिळताच पैसे परत करण्याचे आश्वासन देत आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी अलघ बंधूंचा पीडितांशी निगडित एका युवकाशी वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण चिघळले.अनेक नागरिकांनी उचलला फायदाआरोपी अलघ बंधूंकडून अनेक नागरिकांनी फायदा घेतला आहे. त्यांचे पोलीस आणि गुंडांशी संबंध आहेत. त्यांची सरबराई करताना आरोपींचे खिसे रिकामे झाले. त्यांनाही बाजारातून मोठी रक्कम घ्यावयाची आहे. अलघ बंधू हॉटेल आणि फायनान्सच्या व्यवसायाशी निगडित आहेत. पोलीस त्यांची माहिती काढत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक