शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

एमडी तस्करीतून बनला कोट्याधीश, ४ हजार ८०० कोटी ड्रग्ज प्रकरण 

By मनीषा म्हात्रे | Updated: November 2, 2022 19:07 IST

अंमली पदार्थ विरोधी विभागाने एमडी तस्करीची साखळी मोडून केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४ हजार ८०० कोटीचा एमडी साठा जप्त केला आहे.

मुंबई :

अंमली पदार्थ विरोधी विभागाने एमडी तस्करीची साखळी मोडून केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४ हजार ८०० कोटीचा एमडी साठा जप्त केला आहे. याच प्रकरणात अटक केलेल्या ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर आणि दोन कंपन्यांचा सीईओ राहिलेल्या एमडी तस्करीचा मास्टरमाईंडप्रेमप्रकाश सिंग (५२) याच्या ड्रग्ज तस्करीतून कमावलेल्या १९ कोटी ५८ लाख किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.शिवाजीनगर परिसरातून शमशुल्ला खान (३८) या ड्रग्ज तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेत अटक केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत  मास्टरमाईंड प्रेमप्रकाश सिंह (५२) याच्यासह अंबरनाथ आणि गुजरातमधील केमिकल फॅक्टरींचे मालक अशा एकूण ०८ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींजवळून तब्बल ०२ हजार ४३५ रुपये किंमतीचे ०१ हजार २१८ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. तर, १ हजार २०० किलोंचा एमडी सदृश्य मालसूद्धा जप्त केला होता. याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सकारात्मक आल्याचे पोलिसांनी सांगितले.  त्यामुळे याची किंमत ४ हजार ८५६ कोटी ४१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हयातील मुख्य आरोपी प्रेमप्रकाश पारसनाथ सिंग याच्या मालमत्तेची व बँक खात्याची माहिती घेतली असता त्याने अंमली पदार्थाच्या व्यापारातून बेकायदेशीररित्या १८ कोटी ४३ लाख ५६ हजार ३३४ रुपये किंमतीचे २ फ्लॅट, ९ गाळे,  १  कार तसेच त्याचे कुटुंबातील सदस्य यांची ०६ बँक खात्यातील शिल्लक रक्कम १ कोटी १४ लाख ८८ हजार २१६ रूपये संपादीत केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार, गुन्हे शाखेने त्याच्या एकूण १९ कोटी ५८ लाख ४४ हजार ५५० रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केली असून याबाबतच अहवाल संबंधितां सक्षम प्राधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.