शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठीच केली मयांकची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 10:01 IST

व्यवसायासाठी होती गरज : आराेपींना ६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा रोडच्या क्लस्टर १ मध्ये येथील मयांक ठाकूर (१३) या आठवीच्या विद्यार्थ्याचे अपहरण व हत्या करून ३५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींनी व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने चार महिन्यांपूर्वीच कट आखल्याची कबुली दिली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकू, दुचाकी, कपडे, सिमकार्ड आदी पोलिसांनी जप्त केले आहेत. दाेन्ही आराेपींना ६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. 

पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अफझल मोहम्मद अन्सारी (२२) याला स्वतःचे सलून टाकण्यासाठी, तर मॅकेनिक असलेल्या इमरान नूरहसन शेख (२५) याला स्वतःचे गॅरेज टाकायचे होते. तसेच लग्न करायचे हाेते. यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे आरोपींनी हे पैसे मिळवण्यासाठी एखाद्या मुलाचे अपहरण करण्याचा कट चार महिन्यांपूर्वी केला होता. त्यानुसार अफझल याने काही दिवसांपूर्वीच मयांकला हेरून त्याच्याशी जवळीक साधली. त्यानुसार ३१ जुलैला अफझल व इमरान यांनी मयांकला दुचाकीवरून फिरायला नेताे, सांगून नायगाव महामार्गावरील कामण खाडीपुलाजवळ नेले. तेथे त्याला आधी पुलावरून खाली फेकले, पण तो जिवंत असल्याचे पाहून चाकू भोसकून त्याची हत्या केली, असे उपायुक्त काळे यांनी सांगितले. 

 अपहरण व नंतर खंडणीचा कॉल आल्याने पथकाने अफझलला रॉयल पॅलेस इमारत परिसरातून तर इमरान याला नयानगरमधील त्याच्या मैत्रिणीच्या इमारतीच्या आवारातून १ ऑगस्टला अटक केली होती. 

मयांककडून मिळवलेल्या सिमकार्डचा वापरअफझलने आधीच मयांकला मोबाइल देतो सांगून घरातून सिमकार्ड आणायला सांगितले होते. त्याच सिमकार्डवरून १ ऑगस्टला दुपारी त्यांनी आधी आई हिनाला कॉल करून २५ लाखांची मागणी केली. नंतर रात्री पुन्हा कॉल केला असता ताे हिना यांनी उचलला नाही. त्यामुळे त्यांनी मयांकचा मामा विष्णू सिंग याला कॉल करून ३५ लाखांची खंडणी मागितली.