शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बापरे! प्रियकराला वश करणं प्रेयसीला महागात पडलं; मांत्रिकानं ८ लाखांना गंडवलं

By वैभव गायकर | Updated: August 23, 2022 16:51 IST

खानसाहेबने मागणी केल्यानुसार तरुणीने प्रियकराचा फोटो व ५० हजार रुपये पाठवून दिले. मात्र खानसाहेबने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून एकूण ८ लाख ९५ हजार रुपये उकळले.

वैभव गायकर

पनवेल - ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने खारघरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीकडून ऑनलाईन ८ लाख ९५ हजाराची रक्कम उकळून तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील भामट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 

या घटनेतील २७ वर्षीय तरुणी खारघरमध्ये मैत्रिणीसह राहाण्यास असून ती मुंबईतील एका आयटी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणांमुळे ते तुटले.तरुणीने त्याच्याशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.मात्र संपर्क होत नसल्याने वशीकरणाचा आधार घेण्याचा तिने प्रयत्न केला व रुखसार नावाच्या महिलेशी संपर्क साधला. तिने खानसाहेब जादुई शक्तीने प्रियकराला तिच्यापर्यंत घेऊन येईल असे सांगितले. त्यानुसार तरुणीने खानसाहेबशी संपर्क साधला. या कामासाठी करून टाकला.

खानसाहेबने मागणी केल्यानुसार तरुणीने प्रियकराचा फोटो व ५० हजार रुपये पाठवून दिले. मात्र खानसाहेबने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून एकूण ८ लाख ९५ हजार रुपये उकळले. इतके पैसे दिल्यानंतर देखील काहीच काम न झाल्याने आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तरुणीने खानसाहेबकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर भामट्याने आपला मोबाईल बंद करून टाकला. त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत सल्लामसलत करून खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खानसाहेबविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोधसुरू केला आहे.