शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता 

By मिलिंदकुमार साळवे | Updated: March 23, 2021 16:20 IST

Mansukh Hiren : एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.  

ठळक मुद्दे  ८ मार्च रोजी सचिन वाझे यांचे एटीएसने जबाब नोंद केले असता त्यांनी मी मनसुख यांना ओळखत नसून मला स्कॉर्पिओबद्दल माहिती नाही असे सांगितले. वाझे यांच्या कोठडीसाठी २५ मार्चला कोर्टात एटीएस अपील दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली.   सचिन वाझेंचा जबाब खोटा असल्याचे पुरावे एटीएसकडे प्राप्त झाले असून त्यांच्या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे ? याबाबत चौकशी चालू आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या अँटिलीया इमारतीनजीक जिलेटीन कांड्यासह स्कॉर्पिओ कार आढळली. त्यानंतर तपासादरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन Mansukh Hiren यांचा अचानक मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह आढळला. या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून एटीएसने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.   Accused destroyed SIM card, CCTV; Possibility of further arrest from ATS

  

८ मार्च रोजी सचिन वाझे यांचे एटीएसने जबाब नोंद केले असता त्यांनी मी मनसुख यांना ओळखत नसून मला स्कॉर्पिओबद्दल माहिती नाही असे सांगितले. मात्र, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांच्यावरवर संशयाचे बोट दाखवल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. याप्रकरणी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून काही साक्षीदार कोर्टात सीआरपीसी १६४ अन्वये साक्ष देण्यास तयार आहे. मुख्य आरोपी सचिन वाझे यांचा ट्रान्सीट रिमांडला कोर्टाकडून परवानगी मिळाली असून त्यांची NIA कोठडी २५ मार्चला संपणार आहे. त्यामुळे वाझे यांच्या कोठडीची २५ मार्चला कोर्टात एटीएस अपील दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली.   

 

घटनास्थळी कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. तपास अधिकाऱ्यांना तपासात मृतदेहाच्या अंगावर संशयित आरोपींकडे घेऊन जाणारे कोणतेही पुरावे मिळालेले नव्हते. गुन्हा नोंद केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ८ मार्चला संशयित आरोपी सचिन वाझे यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांनी चौकशीत त्यांच्याविरुद्ध असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सचिन वाझेंचा जबाब खोटा असल्याचे पुरावे एटीएसकडे प्राप्त झाले असून त्यांच्या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे ? याबाबत चौकशी चालू आहे. 

तसेच चौकशीत प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिमकारचा शोध लावला. गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड हे मुंबईतील पात्याच्या क्लब आणि बेटिंग घेणाऱ्या व्यक्तीने वाझेंच्या सांगण्यावरून त्याच्याकडे काम करणाऱ्या बुकीने गुजरात येथील त्याच्या ओळखीच्या इसमांकडून प्राप्त केली. ती सिमकार्ड ही गुजरातच्या एका कंपनीच्या नावे खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत ती सिमकार्ड बुकी नरेश गोरने सचिन वाझेच्या सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदेला दिली. गोर यांच्यामार्फत १४ सिमकार्ड मागवलेली. त्यापैकी काही सिमकार्ड ऍक्टिव्ह करून शिंदेकडे दिल्याचे व शिंदेने ती सिमकार्ड इतरांकडे देऊन त्याचा वापर गुन्ह्यात केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. हि सिमकार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरले गेले त्यापैकी काही मोबाईल आणि सिमकार्ड आरोपींनी नष्ट केले असल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे. नंतर एटीएसचे पथक चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दीव दमण येथे तपासकामी रवाना झाले. नंतर गुन्ह्यात वापरलेली व्होल्वो कार आणि संशयित व्यक्तीस २३ मार्चला एटीएसने ताब्यात घेतेले. या व्होल्वो कारची एफएसएल कालिना यांच्याकडून तपासणी सुरु आहे. या गुन्ह्यात संशयितांची सखोल चौकशी झाल्यानंतर आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता आहे. 

 

गुन्ह्याच्या अनुषंगाने बराच परिसर, ऑफिसेस आणि मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज घेण्यात आले आहे. तर इतर महत्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याचे काम सुरु आहे. आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून नष्ट केल्याचे पुरावे देखील समोर येत आहेत. आरोपी विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कर्मचारी असून त्याला २००७ साली वर्सोवा येथे लखनभैय्या कथित चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मे २०२० पासून शिंदे पॅरोलवर आहे. रजेवर आल्यानंतर ते या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे यांच्या संपर्कात असून त्यांच्या बेकायदेशीर कामांत त्यांना सहकार्य करायचा. मनसुख कटात आणखी कोण सहभागी आहेत. तसेच कटाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याबाबत एटीएस सखोल तपास करत आहे. अटक दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे, अशी माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणAnti Terrorist SquadएटीएसMumbaiमुंबईsachin Vazeसचिन वाझेArrestअटक