शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एका मिनिटाचा नग्न व्हिडिओ तयार करून उकळले २.२२ लाख

By नरेश रहिले | Updated: October 4, 2023 19:17 IST

युट्यूबवर व्हीडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

गोंदिया: सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची, पुढे मधाळ संवादातून अश्लील व्हिडीओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच याच व्हिडीओच्या आधारे खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीने गोंदियातील एका व्यक्तीला तब्बल २ लाख २२ हजार ६०० रूपयांनी लुटले. आपल्याला वारंवार सेक्सटॉर्शन होत असल्याचे पाहून त्याने गोंदिया शहर पोलिसात दोघांविरूध्द तक्रार केली.

गोंदिया शहराच्या सिंधी कॉलनीत राहणाऱ्या कमल राजलदास दुलानी (४३) नग्न फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख २२ हजार ६०० रुपये उकळले. १२ सप्टेंबर २०२३ रोजी आय अमनिता कुमारी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कमल दुलानी यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. १३ सप्टेंबर रोजी ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्यात आली. त्या दोघांची चॅटिंग सुरू झाली. त्या एकमेकांनी चॅटींग करतांना आपापला मोबाईल नंबर दिला. १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ते ११ वाजता दरम्यान तुम्हाला माझ्याशी व्हाॅट्सॲपवर एन्जॉय करायला आवडेल का असे ती महिला बोलली. तिच्यावर विश्वास ठेवून कमल यांनी होकार दिला. दोघांनी नग्न होऊन व्हिडीओ तयार केला.

कॉल संपतात तिने फोन करून ३६ हजार ९०० रुपये रक्कम पाठवून दे नाहीतर मी आपल्या दोघांचा कपडे काढलेल्या व्हिडिओ युट्युबवर व्हायरल करीन अशी धमकी दिली. परंतु कमल दुलानी यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा १६ सप्टेंबर रोजी राम पांडे नावाचे व्यक्तीने त्यांना फोन करून ३६ हजार ९०० रुपयाची मागणी केली. अन्यथा त्या महिलेसोबत तुझ्या काढलेल्या नग्न व्हिडिओ युट्युबवर व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून फोन पे वर ३६ हजार ९०० रुपये पाठवले. परंतु राम पांडे याने वारंवार फोन करून चार वेळा एक लाख ४७ हजार ६०० रुपये उकळले. राम पांडे याने १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुन्हा फोन करून पैश्याची मागणी केली १८, २० व २२ या तीन दिवसात २५ हजार प्रमाणे ७५ हजार रूपये पुन्हा उकळले. आरोपीवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ५०७, ३४ सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ डी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी करीत आहेत.एका मिनीटाच्या व्हीडिओची किंमत मोजली २:२२ लाखएका मिनिटाची नग्न व्हिडीओ तयार करून फोन कट करून लक्षणार्धात धमकी देण्यात आली. ३६ हजार ९०० प्रमाणे चार वेळात १ लाख ४७ हजार ६०० रूपये मागितले तर २५ हजार प्रमाणे तीन वेळा ७५ हजार रूपये मागितले. १४ ते २२ सप्टेंबर या नऊ दिवसात २ लाख २२ हजार ६०० रूपये मोजून हताश झालेल्या कमल राजलदास दुलानी यांनी पोलिसात तक्रार केली.युट्यूबवर व्हीडीओ व्हायरल करण्याची दिली धमकीदोघांचा नग्न व्हिडिओ युट्युबवर व्हायरल करीन अशी धमकी देत त्या महिलेने व तिच्या मदतीला असलेल्या पुरूषाने सेक्सटॉर्शन करून पैसे उकळले. सन २०२१ या वर्षात सेक्सटॉर्शनप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला. हनी ट्रैप लावून पैसे उकळणाच्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. गोंदियातही पाय रोवण्याचा प्रयत्न झाला आहे.फसवणूक करणाऱ्या टोळ्या गोंदियातहीया टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी उत्तीर्ण मुलांना घेतले जाते. त्यांना हे गुन्हे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ही टोळी एखाद्या सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळते. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणातील टोळ्या तयार झाल्या आहेत. हनी ट्रैप लावून पैसे उकळणाच्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. अशा टोय्या गोंदियातही आहेत.काय काळजी घ्याल?-अशा घटनांपासून सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची सेटिंग प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.-त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाऊंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका.