शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र नवलानीविरोधात लूक आउट नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 10:06 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानुसार, केंद्रीय यंत्रणा ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ईडी अधिकारी असल्याचे सांगून ५९ कोटी उकळल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधात गुन्हा नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे. तो परदेशात पळून गेल्याच्या शक्यतेतून त्याच्या विरोधात एसीबीने लूक आउट नोटीस जारी केली आहे. नवलानीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानुसार, केंद्रीय यंत्रणा ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवत आहे. त्यात नवलानीसह ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी अरविंद भोसले यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली.  त्यापाठोपाठ एसीबीकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून २०१५ ते २०२१ या कालावधीत नवलानीने ५८ कोटी ९६ लाख ४६ हजार १०८ रुपये एवढी रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या रक्कमा नवलानी याने स्वतःच्या नावाने तसेच बनावट शेल कंपन्यांच्या नावाने असुरक्षित कर्ज व सल्लागार शुल्क या स्वरूपात घेतली होती.  या रकमा नवलानीने ईडी अधिकाऱ्याला त्यांचे कर्तव्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अथवा तसे भासवून स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

यामुळे बजावली नोटीसअखेर याप्रकरणी नवालानी व इतर विविध कंपन्यांसह ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच गुह्यांत नवलानी पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. यापूर्वी त्याला समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नसल्याचे एसीबीने सांगितले. तो फरार झाल्याच्या शक्यतेतून त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केल्याचे एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.