शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वैमनस्यातून भाजप कार्यकर्त्याचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 4, 2022 20:39 IST

ठाणे न्यायालयाचा आदेश: भिवंडीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: आॅक्टोंबर २०१४ मध्ये झालेल्या  विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपचे मकसूद शेख याने भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे काम केले होते. याच रागातून त्याचा खून करणाºया  अहमद कमाल अब्दुल मोबिन अन्सारी उर्फ पप्पू पुरीवाला याला मंगळवारी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांनी जन्मठेपेची तसेच पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांच्या अतिरिक्त कैदेचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

    भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १० डिसेंबर २०१४ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा खूनाचा प्रकार घडला होता. विधानसभा निवडणूकीच्या वेळी  भिवंडी पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश चौगुले हे निवडून आले होते. या निवडणूकीत मकसूद शेख याने चौगुले यांच्या प्रचाराचे काम केले होते. त्यावेळी काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार शोएब गुडडु हे होते. यामध्ये आरोपी आसीफ शेख आणि आरीफ शेख यांनी काँग्रेसचे उमेदवार शोएब यांच्यासाठी काम केले होते. आपल्या वॉर्डमध्ये आपल्या विरोधात मकसूदने काम केल्यामुळे आसीफ आणि आरीफ हे दोघे त्याच्यावर चिडून होते. यातूनच त्यांनी त्याला प्लंबिंगचा व्यवसाय न करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर त्यांच्यात वारंवार वेगवेगळया कारणांनी वादही झाले होते.

मकसूदमुळे आपल्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो,  या कारणामुळे आसीफ आणि आरीफ यांनी अहमद  मोबीन अन्सारी याच्याशी संधान साधून त्याला मकसूदच्या खूनाचा कट केला. यातूनच  मकसूद याच्या घरासमोरील बोअरवेलची नळजोडणी करीत असतांना अहमद  अन्सारी  याने मकसुदच्या मानेवर, डोक्यावर तोंडावर, बरगडीच्या डाव्या बाजुस, चाकुने वार करून गंभिर त्याचा खून केला. याप्रकरणी अहमदसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात तिघांनाही अटक झाली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. पी. आहेर यांनी या प्रकरणाचा तपास केला. याच खटल्याची सुनावणी ४ आॅक्टोंबर रोजी ठाणे न्यायालयात झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी १९ साक्षीदार तपासून आरोपींना शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. मात्र, यातील आरीफ आणि आसिफ या दोघांची निर्दोष मुक्तता झाली. तर अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालय