शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला आजन्म कारावास अन् १० हजार रुपयांचा दंड!

By विजय.सैतवाल | Updated: July 20, 2024 21:27 IST

पत्नी झोपलेली असतानाच डोक्यात टाकली होती कुऱ्हाड

जळगाव : पत्नी दुसऱ्यासोबत निघून जाईल या संशयावरुन खाटीवर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड टाकून खून करणाऱ्या भिकन भाऊराव पवार (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. १३ जणांची साक्ष, प्रभावी पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावत १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भिकन पवार याने पत्नी सोडून दुसऱ्यासोबत निघून जाईल या संशयावरुन १८ मे २०१९ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पवार यांनी पत्नी अन्नपूर्णा पवार घराबाहेर खाटेवर झोपलेली असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले होते. याप्रकरणी पोलिस पाटीलांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

गंभीर जखमी असलेल्या अन्नपूर्णा पवार यांचा उपचार सुरु असताना दि. १९ मे २०१९ रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले. तपासधिकारी पोउनि युवराज रबडे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

१३ जणांच्या साक्षमारेकरी भिकन पवार यांच्याविरुद्ध दाखल असलेला खूनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये पोलिस पाटील, तपासधिकाऱ्यांसह चौघांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.

मारेकऱ्यावर होता बलात्काराचाही गुन्हाया घटनेच्या तीन महिन्यांपूर्वीच भिकन पवार याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची बाब सरकारपक्षातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांसह प्रभावी युक्तीवादावरुन भिकन पवार यानेच खून केल्याची निष्पन्न झाल्यानंतर त्याला दोषी ठरविण्यात आले.

न्या. जे. जे. मोहीते यांच्या न्यायालयाने भिकन पवार याला आजन्म कारावास, १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून तो न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. नीलेश चौधरी यांनी काम पाहिले. केस वॉच पोकॉ दिलीप सत्रे तर पैरवी अधिकारी पोलिस नाईक चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :jailतुरुंगCourtन्यायालय