शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ गेम खेळू देत नाही म्हणून घर सोडले; छत्तीसगडमधून थेट आला महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 06:49 IST

पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी २० पेक्षा अधिक मुलांना पालकांचा शोध घेऊन  ताब्यात दिले आहे.

धाटाव : पालकांनी व्हिडीओ गेम खेळण्यास नकार दिल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलाने घर सोडून छत्तीसगड राज्यातून थेट रायगडमधील रोहा स्थानक गाठले. मात्र, रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो स्वगृही परतला आहे. या अल्पवयीन मुलाला रेल्वे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले असून, पालकांनी त्यांचे आभार मानले.

पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी २० पेक्षा अधिक मुलांना पालकांचा शोध घेऊन  ताब्यात दिले आहे. त्यातीलच एक असणारा सचिन संतोष कुमार गुप्ता (१४, रा. चंद्रनगर भलाई, जिल्हा दुर्ग, छत्तीसगड) या अल्पवयीन मुलाने आई-वडील मोबाइलवर व्हिडीओ गेम खेळू देत नाहीत, अभ्यासाचा तगादा लावतात या रागातून क्लासला जात असल्याचे सांगून १० सप्टेंबरला घर सोडले होते.

सायकल घेऊन घरातून निघालेल्या संतोषने सायकल रस्त्यात टाकून थेट रेल्वे स्टेशन गाठले. छत्तीसगडवरून तो महाराष्ट्रात कल्याण स्टेशनला उतरला. तेथून पनवेलला आल्यावर स्टेशनवर  कोकणात जाण्यासाठी उभ्या असलेल्या रेल्वेमध्ये बसून प्रवास करत असताना तो रोहा येथे आल्यावर रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी त्याची चौकशी केली. त्याने रागातून घर सोडल्याचे सांगितले. त्यांनी त्याला धीर देत त्याच्याकडून पालकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले.