शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

इस्टेट एजंटचे केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:00 IST

नालासोपाऱ्याची घटना । चौघांवर गुन्हा दाखल

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणारा व इस्टेट एजंटचा व्यवसाय करणाºया ३० वर्षीय तरुणाचे पैशासाठी अपहरण केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्कया इमारतीच्या सदनिका नंबर क्यू/२०२ मध्ये धीरज घनश्याम दुबे (३०) हा राहत असून तो इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. ८ आॅगस्टला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या घरी भारत भोकरे आणि जितेंद्र म्हात्रे नावाचे दोघे आले. घराबाहेर बोलण्यासाठी धीरज आल्यावर त्याला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करत इमारतीच्याखाली आणून गाडीत कोंबले. अपहरण करून कळवा याठिकाणी आणले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे.

पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीवाटेत त्याला शिवीगाळ व मारहाण करून घरच्यांना फोन लावून ५ लाख रुपये घेऊन येण्यास सांग अन्यथा तुला जीवे मारण्याची धमकी दिली. ठाणे येथेच राहणारे दिनेश कुशवाह यांच्याकडून ७ लाख रूपये धीरजला येणे बाकी होते. म्हणून त्यांना अपहरण ठिकाणी बोलावून येणारे पैसे भारत आणि जितेंद्र याला दे असे जबरदस्तीने सांगण्यास प्रवृत्त केले. घडलेली हकीकत धीरजने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन सांगितल्यावर शुक्र वारी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसाची बतावणी करून वृद्धेला लुटलेनालासोपारा : पूर्वेकडील सेंट्रल पार्कयेथील अंबिका टेलर्सच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील कोपºयावर शुक्र वारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ६४ वर्षीय महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे. तुळींज पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वंदना दत्ता सकपाळ (६४) या शुक्रवारी सकाळी शिवण्यासाठी दिलेले कपडे घेण्यासाठी गेल्या असता शिवून झाले नसल्याने घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून लुटले. ३० हजारांची माळ काढून हातचलाखी करून चोरून पळून गेले.