शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

कणेरकर आत्महत्या; सहा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:52 IST

कणेरकर यांच्या पत्नीने याबाबत तक्रार केली होती.

अलिबाग : सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया मुंबई राज्य गुप्त वार्ता नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कणेरकर यांच्या पत्नीने याबाबत तक्रार केली होती. कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्यासोबत काम करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. आपल्याच सहकाºयांनी चोरीचा आरोप लावल्याने नैराश्य व शेरेबाजीला कंटाळून कणेरकर यांनी आत्महत्या केली असल्याचे आता समोर आले आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यातील एडीसी नम्रता अलकनुरे, प्रशांत लांगी, स. आ. इनामदार, आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप यातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.१६ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अलिबागच्या पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहमधील रूम नंबर पाचमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी कणेरकर यांनी आत्महत्या का करतो याबाबत सुसाईड नोट लिहून ठेवली होती. अलिबाग पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी जलदगतीने तपास करण्याचे आदेश अलिबाग पोलिसांना दिले होते. कणेरकर यांनी सुसाईड नोटमध्ये काय मजकूर लिहिला होता याबाबत पोलिसांनी गुप्तता राखली होती. मात्र सुसाईड नोटमध्ये काही अधिकाºयांची नावे असल्याचे पोलिसांनी कबूल केले होते.आत्महत्येचे मूळ कारणप्रशांत कणेरकर हे राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्ष मुंबई येथे सेवेत रु जू असताना २०१८ मध्ये त्यांचे सह अधिकारी प्रशांत लांगी यांचे पाकीट चोरीला गेले. आपले पाकीट चोरीला गेल्याचा आरोप प्रशांत लांगी यांनी प्रशांत कणेरकर यांच्यावर केला होता. नुसता तोंडी आरोप न करता तशा आशयाची लेखी तक्र ार प्रशांत लांगी यांनी एडीसी अलकनुरे यांच्याकडे केली होती. लांगी यांनी केलेल्या तक्र ारीच्या आधारे अलकनुरे यांनी प्रशांत कणेरकर यांना मेमो दिला आणि लेखी उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतर काढलेला मेमो प्रशांत कणेरकर यांना दिला नाही. अलकनुरे, प्रशांत लांगी, स.आ. इनामदार, आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी यांनी प्रशांत कणेरकर यांना या प्रकरणावरून टोमणे मारण्यास सुरु वात केली होती. वारंवार शेरेबाजी करून त्यांच्यावर चोरी केल्याचा आरोप करण्यास सुरु वात केली होती. त्यानंतर त्यांची रायगड पोलीस दलात बदली झाली होती.