शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:17 IST

राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गेल्या वर्षी दिल्लीतील निवासस्थानी जळालेल्या चलनी नोटा सापडल्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. स्वत:हून राजीनामा दिल्याने त्यांना आता पेन्शनचा लाभ मिळू शकेल.

न्या. वर्मा यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना न्या. वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होळीच्या दिवशी १४ मार्च २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाने आग विझवल्यानंतर या खोलीत प्रचंड प्रमाणात जळालेल्या चलनी नोटा सापडल्या होत्या.

९ एप्रिल रोजी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात ५७ वर्षीय न्यायमूर्ती वर्मा यांनी आपण अत्यंत दु:खी मनाने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. या पदावर सेवा करणे ही आपल्यासाठी गौरवाची बाब होती, असे त्यांनी नमूद केले आहे. न्या. वर्मा यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राकेश पांडेय यांनी म्हटले आहे.

असा आहे घटनाक्रम

  • १४ मार्च २०२५ : दिल्लीत तुघलक क्रिसेंटस्थित न्यायाधीशांच्या या बंगल्यात रात्री साडेअकरा वाजता आग लागली. यात जळालेल्या नोटांचे बंडल होते.
  • ३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने न्या. वर्मा यांना गैरव्यवहारात दोषी ठरवले व पदावरून हटवण्याची शिफारस केली.
  • ८ मे रोजी सरन्यायाधीशांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींना पत्र लिहून पद सोडण्यास नकार देणाऱ्या न्या. वर्मांविरुद्ध महाभियोग चालवण्याची शिफारस केली.
  • १२ ऑगस्टला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी न्या. वर्मा यांना बडतर्फ करण्यासंबंधी सर्वपक्षीय प्रस्ताव स्वीकारला.
English
हिंदी सारांश
Web Title : Justice Verma Resigns Amid Burnt Money Case; Pension Approved

Web Summary : Justice Yashwant Verma resigned after burnt currency notes were found. He will receive pension benefits. An investigation was underway regarding the incident. Preceding this, a recommendation was made to remove him from his position following an inquiry.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूHigh Courtउच्च न्यायालय