शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पंधरा हजाराची लाच स्वीकारताना महावितरणचा कनिष्ठ अभियंता जेरबंद

By राजेश भोस्तेकर | Updated: January 24, 2023 15:57 IST

घराचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मागितली होती लाच

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: घराचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मागितलेल्या लाचे प्रकरणी मुरुड विभागातील कोकबन मधील ओम विश्वनाथ शिंदे वय 29 वर्षे कनिष्ठ अभियंता यास लाच लुचपत पथकाने १५ लाच स्वीकारताना अटक केली आहे. त्यामुळे महावितरण मध्ये लाचखोरी प्रकरण समोर आले आहे.

तक्रारदार याच्या कोकबन गावातील राहत्या घराचा वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी खंडित केला होता. याबाबत तक्रारदार यांनी कोकबन विभागाचे कनिष्ठ अभियंता ओम शिंदे याच्याशी संपर्क केला होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १५ हजार देण्याचे निश्चित झाले.

तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे उपविभागीय लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून शिंदे यांनी १५ हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. लाच लुचपत विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सुषमा सोनावणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रनजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागले, पोना जितेंद्र पाटील यांनी यशस्वी कारवाई केली.

टॅग्स :ArrestअटकRaigadरायगडalibaugअलिबाग