शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इराणी टोळीतील चोर जेरबंद; मुंबई, पुणे, ठाण्यात केल्या चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 09:49 IST

टॉप २० यादीतील वॉन्टेड  याआधीही इराणी टोळीतील चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे आणि नवी मुंबई परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच मंगळसूत्र जबरीने खेचून पळणाऱ्या इराणी टोळीतील सराईत चोरटा मेहंदी हसन मुस्लीम जाफरी (२८, रा. रशिद कम्पाउंड, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली. ठाणे पोलिसांच्या टॉप २० यादीतील वॉन्टेड सोनसाखळी चोरट्यांमध्येही त्याचा समावेश होता.

मुंब्रा येथील रशीद कम्पाऊंड भागात टॉप २० यादीतील इराणी टोळीमधील मोस्ट वॉन्टेड सोनसाखळी चोरटा जाफरी येणार असल्याची टीप अमली पदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय मोरे, जमादार मोहन परब, हवालदार   राजकुमार तरडे, अभिजीत मोरे, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ आणि अनुप राक्षे आदींच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास मुंब्रा परिसरात गस्त घालीत असताना जाफरी याला रशीद कम्पाउंड भागात सापळा रचून ताब्यात घेतले.याआधीही इराणी टोळीतील चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.

मेहंदी जामिनावर      होता सुटलेला  यापूर्वी ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी सोनसाखळी जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो जामिनावर सुटला आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.

ताब्यात घेताना इराणींचा कांगावा...मेहंदी जाफरी याच्याविरुद्ध मुंबई ठाण्यासह डायघर पोलीस ठाण्यातही जबरीने सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी २०२१ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला पकडण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक गेले, त्यावेळी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी या पथकातील कर्मचाऱ्यांशी काही इराणी महिला, पुरुषांनी झटापटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या इराणींशी सामना करून या पथकाने जाफरीला त्यांच्या तावडीतून ताब्यात घेत आधी मुंब्रा नंतर डायघर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने डायघर चोरीची कबुली दिली.