शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अखेर पतीच निघाला पत्नीच्या हत्येचा आरोपी; वडनेर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

By विवेक चांदुरकर | Updated: January 24, 2024 15:35 IST

याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वडनेर भोलजी (खामगाव जि. बुलढाणा) : वडनेर शेत शिवारात २१ जानेवारी रोजी गंगा नितीन कळस्कार यांचा चाकूने वार करून, दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या महिलेचा पतीच आरोपी निघाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

गंगा कळस्कार यांची हत्या झाल्यानंतर पती नितीन कळस्कार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलविले. तपासामध्ये पोलिसांना घटनास्थळी एक चाकू व आरोपीचा दुपट्टा सापडला. पोलिस श्वान रानीला चाकूचा गंध दिला असता मृत महिलेचा पती आरोपी नितीन एकनाथ कळस्कार याचा मार्ग दाखवला. तसेच रुमाल, दुपट्ट्याचा गंध दिला असता आरोपी नितीन कळस्कार याच्याकडेच मार्ग दाखवला. गुन्ह्यातील चाकूही आरोपीच्या घरातील होता. तसेच गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे मोबाइल लोकेशन घटनास्थळी शेतातच आढळले. तसेच आरोपी शेतात जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज मिळाल्याने नांदुरा पोलिसांनी आरोपी मृत महिलेचा पती नितीन एकनाथ कळस्कार (वय ४४) याला अटक केली. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, एसडीपीओ गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले, कैलास सुरडकर, मिलिंद जवंजाळ, राहुल ससाने, विनोद भोजने, मानकर झगरे, रविंदर सावले, महिला अंमलदार कल्पना गिरी, दीपाली सुरडकर यांनी केली.

टॅग्स :Arrestअटक