शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप पकडली

By appasaheb.patil | Updated: December 16, 2022 14:08 IST

साडे बाराशे लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सोलापूर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारु विरोधात मोहिम राबविण्यात येत असून १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळेगाव तांड्यावरुन निघालेल्या जीपचा पाठलाग करुन एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाब्यांवर दारु पिण्याची व्यवस्था करुन देणारे तसेच तेथे बसून दारु पिणा-यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान १५ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवर पाळत ठेवली असता मुळेगाव तांड्यातून एक जीप क्रमांक एमएच ०६ डब्लू ६८३७ ही भरधाव वेगाने बोरामणीकडे जात असतांना दिसून आली. या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता जीपचालकाने भरधाव वेगाने जीप पळवून लावण्याचा प्रयत्न केला. एक्साईजच्या पथकाने जीपचा सिनेस्टाईल पाठलाग करुन सोलापूर-हैद्राबाद रोड वरील मुळेगाव तांड्याच्या हद्दीतील डाळ मिल समोरील रोडवर जीप पकडली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, सुनिल पाटील, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर,जवान प्रकाश सावंत, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

दोघांवर गुन्हा दाखल, वाहन केले जप्तजीपची झडती घेतली असता त्यात वाहनचालक धर्मराज अंकुश माने व भगवान देविदास निकम (रा. बक्षी हिप्परगा ता. द. सोलापूर) आढळून आले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील १४ रबरी ट्यूबमध्ये भरलेली एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण पाच लाख चौसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत केला. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभाग