शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून एकाचा खून; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 09:50 IST

नऱ्हे येथील घटना, सुनील नलवडे यांना नऱ्हे भागात आणून ठार मारण्याच्या हेतूने जबर मारहाण केली

धायरी: अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. सुनिल राधाकिसन नलवडे (वय:५४ वर्षे, भैरोबानाला, फातिमानगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नलवडे हे पूर्वी कॅम्प भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत असत.  शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावरील आशा पुष्प शाळेजवळ असणाऱ्या विश्व रेसिङंन्सीजवळ एका चारचाकीमध्ये अज्ञात पाच - सहा जणांनी सुनील नलवडे यांना घेऊन आले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेत असणाऱ्या सुनील नलवडे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी सुनील नलवडे यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाल्याने ते एकटेच राहत होते. सध्या ते ठिकठिकाणी फिरून झेरॉक्स मशीन दुरुस्ती करीत असत. तसेच त्यांनी काहीजणांकडून कर्ज घेतले असल्याची माहिती मिळत आहे. 

नऱ्हे परिसरात आणून केली जबर मारहाण...सुनील नलवडे यांना नऱ्हे भागात आणून ठार मारण्याच्या हेतूने जबर मारहाण केली. मात्र मुळात ते या भागात राहावयास नव्हते, त्यामुळे त्यांना या भागात आणून मारहाण का करण्यात आली याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. सुनील नलवडे यांचा भाऊ सुदाम हेही गेली पाच वर्षे त्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे पैश्याच्या व्यवहारातून खून झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.