शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला संपवलं; हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By देवेंद्र पाठक | Updated: February 5, 2023 22:56 IST

साक्रीत पत्नीचा खून, सलग दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.

धुळे - कौटुंबिक वाद विकोपाला जावून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाल्याने उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. ही घटना साक्री शहरातील गवळी वाडा भागात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर पतीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

किरण पुरूषोत्तम मोरे (वय ३३) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम नामदेव मोरे (वय ४२) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे नाव आहे.याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दरम्यान जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडलेलीआहे.

साक्री शहरातील गवळी वाडा भागात पुरुषोत्तम मोरे हे पत्नी किरण सोबत वास्तव्यास होते. त्यांच्यात रविवारी कौटुंबिक वाद झाला. हा वाद विकाेपाला गेला. किरण ही स्वयंपाक करीत असतानाच पुरूषोत्तम याने कांदा चिरण्याच्या चाकूने किरणवर सपासप वार केले. यात ती रक्तबंबाळ होऊन घरातच निपचत पडली. यानंतर त्याने संतापाच्या भरात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच परिसरात गर्दी जमा झाली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलिसांच्या फौजफाट्यासह तातडीने दाखल झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून किरण हिला मृत घोषित केले. तर तिचा पती पुरुषोत्तम याच्यावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम साक्री पोलिस ठाण्यात सुरु होते. दरम्यान जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.