शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा पेपर फुटीप्रकरणी ५ जण अटकेत; सायबर सेलेचे पथक मदतीसाठी धावले

By निलेश जोशी | Updated: March 5, 2023 11:59 IST

साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

बुलढाणा - सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात बारावीचा गणिताच विषय फुटल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे. सायबर सेलचे एक पथकही या तपासात साखरखेर्डा पोलिसांना मदत करत असून कथितस्तरावर बनविण्यात आलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरील डिलीट झालेला डाटाही त्यांच्याकडून रिकव्हर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश शिवानंद नागरे, पवन सुधाकर नागरे, गणेश बद्रीनाथ पालवे (रा. भंडारी), गोपाल दामोधर शिंगणे (रा. शेंदुर्जन), गजानन शेषराव आढे ( किनगाव जट्टू) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रात्री दरम्यानच त्यांना अटक करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना साखरखेर्डा पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तीन मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर समाजमाध्यमावर व्हायरल झाल होता. त्यानंतर शिक्षण विभागाची धावपळ झाली होती. विधीमंडळातही हे प्रकरण गाजले होते. प्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात शनिवारी पाच परीक्षा केंद्रप्रमख, पेपर रनर बदलण्यात आले होते. सोबतच बुलढाणा येथील केंद्र प्रमुखाला नोटीसही बजावण्यात आली होती.

सायबरचे पथक मदतीलाया प्रकरणात सायबर सेलच्या पथकाची साखरखेर्डा पोलिस मदत घेत असून कथितस्तरावर समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या पेपर संदर्भाने एखादा व्हॉट्अप ग्रुप बनवला गेला होता का? त्यात कोणकोण सहभागी होते, या दिशेनेही तपास करण्यात येत आहे. असा एक ग्रुप बनविल्या गेल्याची चर्चा असून संबंधितांनी त्यातील डाटा डिटील केला गेला असल्याची शक्यता गृहीत धरून तो रिकव्हर करण्यासाठी सायबर सेलचे पथक मदत करत असल्याची माहिती आहे. दोन दिवसात त्यादृष्टीने ठोस माहिती समोर येईल असे सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा