शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक; ठाण्यातील घटना

By जितेंद्र कालेकर | Updated: September 24, 2022 19:03 IST

लोखंडे यांच्या घरात पती पत्नींच्या भांडणाचा जोर जोरात आवाज येत होता.

ठाणे: चारित्र्याच्या संशयातून मीना लोखंडे (२३) या आपल्या पत्नीचा दारुच्या नशेतच गळा आवळून खून करणाºया अनिल लक्ष्मण लोखंडे (२८, रा. इंदिरानगर, कळवा, ठाणे) या पतीस अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी शनिवारी दिली. आरोपीला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

आरोपी अनिल याची पहिली पत्नी दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली आहे. मीना ही दुसरी पत्नी होती. त्यांना एक वर्षांची मुलगीही आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिलाही त्याच्या चारित्र्यावर संयश होता. यातूनच त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. २२ सप्टेंबर रोजी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारासही हा वाद आणखीनच उफाळून आला. अखेर अनिल  याने याच रागातून मीनाचा आपल्या एक वर्षांच्या मुलीसमोरच हाताने गळा आवळून खून केला.

लोखंडे यांच्या घरात पती पत्नींच्या भांडणाचा जोर जोरात आवाज येत होता. या दोघांचा तसेच त्यांच्या मुलीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे टेलर रामचंद्र दळवी (३९) यांच्यासह रहिवाशांनी लोखंडे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घरात अनिलची पत्नी मीना निपचित पडलेली आढळली. ही माहिती रहिवाशांनी कळवा पोलिसांना दिली. त्यानंतर अनिल याने रागाच्या भरात तिचा गळा आवळल्याची कबूली पोलिसांना दिली.  पोलिसांनी तातडीने मीना हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेArrestअटक