शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणीटंचाईने बळी; कल्याणजवळ दगड खाणीतील दुर्घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 06:12 IST

कुटुंबातील लहान मुलगा बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता गेलेल्या अन्य चार जणांचाही बुडून मृत्यू झाला.

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण ग्रामीण परिसरातील संदप गावानजीक असलेल्या एका दगड खाणीत पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी महिला खाणीत गेल्या होत्या. 

कुटुंबातील लहान मुलगा बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता गेलेल्या अन्य चार जणांचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरा गायकवाड (५५) त्यांची सून अपेक्षा गायकवाड (३०),  नातू मोक्ष (१३), नीलेश (१५) आणि मयुरेश (१५) हे पाचजण दगड खाणीतील पाणवठ्यावर सायंकाळी कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी खाणीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह रात्री आठ वाजेपर्यंत शोधून काढण्यात आले. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. 

माेक्षपाठाेपाठ भाऊ, आई, आजी बुडालेप्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गायकवाड कुटुंबातील मोक्ष हा खाणीतील पाण्यात बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचविण्याकरिता त्याचे भाऊ, आई व आजी यांनी धाव घेतली. परंतु त्यांचाही बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :kalyanकल्याण