शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रात्री करंट लावून 'तो' करायचा शिकार; वन विभागाने पहाटेच सापळ्यात अडकवले

By गेापाल लाजुरकर | Updated: March 7, 2023 11:59 IST

कुरखेडा तालुक्यातील घटना : आरोपीला तिसऱ्यांदा अटक

कुरखेडा (गडचिरोली) : जंगलात रात्री करंट (वीजप्रवाह) लावून वन्यप्राण्यांची तो शिकार करायचा. त्यानंतर पहाटे शिकार आणण्यासाठी जंगलात जायचा. असे एक नव्हे अनेक वन्यप्राण्यांचा बळी घेऊन मांसाहाराची चटक भागवणाऱ्या गेवर्धा येथील एका शिकाऱ्यास वन विभागाच्या चमूने मंगळवार ७ मार्च रोजी पहाटे ४ वाजता घटनास्थळीच जाळ्यात अडकवले. शिकार प्रकरणात अटक होण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे.

महादेव धोंडू तुलावी (६०) रा. गेवर्धा, ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे. कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा राखीव वन खंड क्रमांक १३३ मध्ये शिकारीचे प्रकार घडत असल्याच्या माहितीवरून वन विभागाचे पथक गस्तीवर होते. दरम्यान सोमवार ६ मार्चच्या रात्री ११:३० वाजताच्या सुमारास जंगलातून जाणारी ३३ केव्ही विद्युत वाहिनी ट्रिप झाली. विद्युतमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनी कार्यालय कुरखेडाचे पथक लाईन दुरुस्तीकरिता गेवर्धा वन परिक्षेत्रात दाखल झाले. महावितरणच्या पथकासोबत वन विभागाचे पथक सुद्धा जंगलातच होते. लाईनमधील बिघाड दुरुस्ती शोधताना रात्री २ वाजताच्या सुमारास विद्युत तारांवर आकडा टाकून वीजप्रवाह सोडून हरणाची शिकार झाल्याची बाब वनविभागाच्या पथकाच्या लक्षात आली. विद्युत कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह सुरळीत केला; पण घटनास्थळी कोणीच उपस्थित नव्हते. ज्याने शिकारीसाठी वीज प्रवाह सोडला तो तेथे परत येईल, अशी खात्री वन विभागाच्या पथकाला होती. या उद्देशाने वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाळत ठेवली. दरम्यान पहाटे ४ वाजता एक व्यक्ती टॉर्च घेऊन घटनास्थळाच्या दिशेने येत असल्याचे दिसले. पथकाने मोठ्या शिताफीने सभोवताल घेरा टाकून त्या व्यक्तीला पकडले.

दरम्यान आरोपीची चौकशी केली असता महादेव धोंडू तुलावी (६०) रा. गेवर्धा, असे त्याने आपले नाव सांगितले. त्यानंतर पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला व शिकारीचे साहित्य जप्त केले. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आहे. ही कारवाई गेवर्धाचे क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे यांच्या नेतृत्वात वनरक्षक एस. डी. लेखामी, एस. व्ही. पिलारे,  व्ही. बी. पावडे, व्ही. एल. हातमोडे यांनी केली. त्यांना वन मजूर अरुण डोंगरवार, प्रभू गायकवाड, हरी नैताम, मनोज वालदे तसेच महावितरणचे कर्मचारी अनिल बगमारे, संदीप क्षीरसागर, गोपाल बनकर, पवन बोरकुटे आदींनी सहकार्य केले.

दोन वेळा सुटला मोकाट; धुळवडीची हौस महागात

करंट लावून वन्य प्राण्यांची शिकार करणे व मांसाहार करण्याची चटक लागलेल्या आरोपी महादेव तुलावी याने यापूर्वीही अनेक शिकारी केल्या. यापूर्वी वनविभागाने त्याला दोन वेळा अटक केली होती; परंतु सबळ पुराव्यांअभावी तो मोकाट सुटला होता; परंतु आता तो रंगेहात अडकला. धुळवडीला मांस खाण्याची हौस त्याला चांगलीच महागात पडली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली