शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

संधी दिली, हद्दपार केले.. तरी सुधारला नाही; अखेर स्थानबद्ध कारवाई, येरवड्यात रवानगी

By विलास जळकोटकर | Updated: August 26, 2023 14:35 IST

पोलीस आयुक्तांकडून ॲक्शन : बाईकचोर, खंडणी उकळणाऱ्या रवी आखाडेवर एमपीडीए

सोलापूर : शहरात दिसेल त्या भागातून बाईक चोरायची. त्याची परस्पर विल्हेवाट लावायची. लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी उकळायची. अशा १४ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगार रवी आखाडे याला सुधारण्यासाठी पोलिसांनी संधी दिली. हद्दपारीची कारवाई केली. तरीही सुधारणा झाली नाही. अखेर त्याला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली. शुक्रवारी रात्री उशिरा पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली.

सराईत गुन्हेगार रवी नामदेव आखाडे याने शहरातल्या सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्या. त्याची परस्पर विल्हेवाट लावली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध १४ गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत. मोटारसायकली चोरीचे गुन्हे करणारा रवी घातक शस्त्रांद्वारे लोकांमध्ये दहशत पसरवून जबरी साथीदारांच्या मदतीने चोऱ्या करायचा. सर्वसामान्य नागरिकांना दुखापत करून धमकी द्यायचा. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रारी वाढल्या होत्या.लोकांना वेठीस धरुन खंडण्याही उकळाचा. सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाली होती.तरीही गुन्हेगारी कृत्य सुरुरवीला वाढत्या गुन्हेगारी कृत्यापासून रोखण्यासाठी २०२१ मध्ये हद्दपार केले. त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्याचे गुन्हेगारी कृत्य त्याने सुरूच ठेवले होते. यामुळे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.