शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! युगुलाचे अश्लिल व्हिडीओ शूटिंग; व्हायरलची भीती दाखवून बलात्कार

By प्रदीप भाकरे | Updated: April 16, 2023 20:42 IST

खंडणीही उकळली, तिघांविरुद्ध गुन्हा, तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व तिनही आरोपी परस्परांच्या परिचयाचे आहेत. दरम्यान त्या मुलीची एका तरुणासोबत मैत्री आहे

अमरावती : एक अल्पवयीन मुलगी व तिच्या मित्राचा अश्लील व्हिडिओ काढून, तो व्हायरल करण्याची धमकी देत त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ११ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावालगतच्या शेतशिवारात ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मुख्य आरोपी राजा राऊत (रा. चांदूूर रेल्वे) याच्यासह संदीप चौधरी व धनंजय अशा तिघांविरुद्ध बलात्कार, विनयभंग, खंडणी व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. तीनही आरोपी पसार झाले आहेत.

तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व तिनही आरोपी परस्परांच्या परिचयाचे आहेत. दरम्यान त्या मुलीची एका तरुणासोबत मैत्री आहे, ते घरी सांगू, अशी भीती घालून तिनही आरोपी मुलगी व तिच्या मित्राला ऑटोत बसवून शिरजगाव कोरडे शिवारात घेऊन गेले. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेदरम्यान आरोपींनी मुलगी व तिच्या मित्राची अश्लील व्हिडीओ शूटिंग केली. ती शूटिंग व दोघांच्या मैत्रीची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी आरोपींनी त्या युगुलाला पैशाची मागणी केली. त्यामुळे घाबरून पीडिताच्या मित्राने आरोपींना दोन दिवसांनी दोन हजार रुपये नेऊन दिले. त्यानंतरदेखील राजा राऊत हा पीडितला त्रास देत होता.

दुचाकीवरून घेऊन गेला शिवारात११ एप्रिल रोजी राजा राऊत व धनंजय नामक आरोपीने पीडिताच्या मित्राला पुन्हा दमदाटी केली. त्याचदिवशी राजा राऊत हा पीडिताला भीती दाखवून त्याच्या दुचाकीवर तालुक्यातील एका रस्त्यालगतच्या शिवारात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली. आरोपीने तिला शहरात सोडून दिले. तिने कसेबसे घर गाठले. मात्र, गुदरलेला प्रसंग सांगायचा तरी कसा, असा प्रश्न तिला पडला. अखेर १५ एप्रिल रोजी सायंकाळी तिने भावाजवळ मन मोकळे केले. त्याने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजा नामक आरोपीने अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तूर्तास तिन्ही आरोपी पसार झाले आहेत.- सुनील सोळंके, ठाणेदार, चांदूररेल्वे