शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नागपुरात  पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:25 IST

पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून एका युवतीची ४४ हजाराने फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी या प्रकारची फसवणूक केलेली ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देदोन दिवसातील दुसरी घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून एका युवतीची ४४ हजाराने फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी या प्रकारची फसवणूक केलेली ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. इमामवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.रुचिरा कडबकर या इमामवाडा येथे राहतात. त्या गृहिणी आहेत. त्यांना १४ फेब्रुवारीला मोबाईलवर ७८६६९३९९८५ या क्रमांकावरून कॉल आला. त्याने रुचिरा यांना त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी केली. रुचिरा यांनी पेटीएम अकाऊंट नसल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्यास नकार दिला. आरोपींनी त्यांना सांगितले की, केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्यांचे अकाऊंट ब्लॉक होईल. त्यांनी रुचिराला प्ले स्टोरवरून क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. रुचिराने ते अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यांनी अ‍ॅपमध्ये बचत खाते आणि डेबिट कार्डची माहिती दाखल करण्यास सांगितले. रुचिराने संपूर्ण माहिती त्या अ‍ॅपवर टाकली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४४ हजार रुपये उडविण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रुचिरा यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. रुचिराला ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला तो हरियाणा येथील असल्याचा संशय आहे. पोलीस क्रमांकाच्या आधारावर आरोपीचा शोध घेत आहेत. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. याच पद्धतीने पेटीएम अकाऊंट ब्लॉक झाल्याची बतावणी करून वीज विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल काशीकर यांची ७५ हजाराने फसवणूक करण्यात आली होती. त्यांनाही सायबर गुन्हेगारांनी अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे उडवले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी