शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विदेशी सफरीच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:32 IST

दुबईची सफर घडवून आणण्याच्या नावाखाली दोन आरोपींनी १४ जणांची फसवणूक केली. अजय राठोड आणि अभिषेक फसिन अशी आरोपींची नावे आहेत. तहसील पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्दे१४ जणांची फसवणूक : तहसीलमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुबईची सफर घडवून आणण्याच्या नावाखाली दोन आरोपींनी १४ जणांची फसवणूक केली. अजय राठोड आणि अभिषेक फसिन अशी आरोपींची नावे आहेत. तहसील पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गांधीबागमधील कापड व्यापारी हितेश गिरीश राजकोटिया (वय ३७) स्वामीनारायण मंदिराजवळ राहतात. १५ जानेवारी २०१९ ला त्यांचे मित्र भाविक पुराणिक त्यांच्याकडे आले होते. त्यांनी विदेशी सफरीवर जाण्यासाठी मोबाईलवर पर्याय बघितले. ट्रीप झोलो टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या पेजवर त्यांनी माहिती बघितल्यानंतर तेथे नमूद मोबाईलवर संपर्क केला. आरोपी अजय राठोड याने दुबईच्या सफरीची माहिती देऊन प्रति व्यक्ती ५५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे हितेश आणि भाविकने नंतर राठोडसोबत सविस्तर चर्चा करून राठोड तसेच फसिनच्या बँक खात्यात २ लाख १० हजार रुपये जमा केले. भाविकने सांगितल्याप्रमाणे आरोपी राठोडने त्यांना नंतर नागपूर ते शारजाह १४ लोकांच्या अरेबिया एअरलाईन्सच्या विमानाचे तिकीट पाठविले. जेव्हा दुबईला जायची वेळ आली तेव्हा आरोपींनी हितेश आणि भाविकला कॅन्सल केलेले तिकीट पाठविल्याचे उघड झाले. १५ जानेवारी ते २९ ऑक्टोबर या कालावधीत हा गैरप्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे हितेश आणि भाविक यांनी आरोपी राठोड तसेच फसिनसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी हितेशने तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रविवारी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.दिल्ली, नोएडाचा पत्ताआरोपी राठोड आणि फसिन यांनी नोएडा, दिल्ली येथे आपले ऑफिस असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची तेथील सूत्रांकडून माहिती घेतली असता असे कोणते कार्यालय आरोपींनी दिलेल्या पत्त्यावर नसल्याचे समजते. त्यामुळे ऑफिसच नव्हे तर त्यांची नावेसुद्धा खरी आहेत का, त्याबाबत संशय आहे. तहसील पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी