शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरण : मनपा महिला लिपिकास दोन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:43 IST

कर संग्राहकपदी नोकरी लावून देण्याची बतावणी करून चौघांचे सहा लाख रुपये हडप करणारी महानगरपालिकेची महिला लिपिक ज्योत्स्ना अविनाश भिवगडे (४०) हिला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देनोकरीसाठी सहा लाख रुपये घेतले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कर संग्राहकपदी नोकरी लावून देण्याची बतावणी करून चौघांचे सहा लाख रुपये हडप करणारी महानगरपालिकेची महिला लिपिक ज्योत्स्ना अविनाश भिवगडे (४०) हिला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. प्रकरणातील दुसरा आरोपी सदानंद गोपाळ जनबंधू (५२) याला पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. न्या. एस. डी. मेहता यांनी या खटल्यावर निर्णय दिला.भिवगडे वैशालीनगर तर, जनबंधू पाचपावली येथील रहिवासी आहे. भिवगडेला भादंविच्या कलम ४२० व कलम ४६८ अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ४६५ व कलम ४७१ अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस चौकशीनुसार, २०१३ मध्ये भिवगडेने कर संग्राहक पदाचे बनावट नियुक्ती आदेश तयार केले होते. तसेच, ते खरे असल्याचे सांगून संदीप बावणे व योगेंद्र अंबादे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख ९० हजार तर, पल्लवी व दीप्ती सहारे या बहिणींकडून २ लाख १५ हजार असे एकूण ५ लाख ९५ हजार रुपये घेतले व त्यांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघडक ीस आल्यानंतर मनपा कर्मचारी विजय बागल यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला होता. तसेच, भिवगडेला ७ नोव्हेंबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. जाधव यांनी प्रकरणाचा तपास केला. सरकारतर्फे अ‍ॅड. समीर दुंगे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयfraudधोकेबाजी