शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नकली नोटा घेऊन फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चौघे जेरबंद; टेंभूर्णा फाट्यावरील घटना

By अनिल गवई | Updated: January 28, 2024 13:31 IST

अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, , खामगाव, जि. बुलढाणा: अप्पर पोलीस अधिक्षक पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभूर्णा फाट्यावर रविवारी पहाटे करण्यात आली. यात चौघांना जेरबंद करण्यात आले. यातील एकावर यापूर्वीच नकली नोटाप्रकरणी एक कारवाई झाली आहे.

तक्रारीनुसार, खामगाव शहरातील चौघे जण  एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आले. दरम्यान, बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली. त्यावेळी काळ्या रंगाची बॅग, ५०० रुपये दराच्या ८४९ व २०० रुपयांच्या दोन, १०० रुपयांच्या आठ, ५० रुपये किंमतीच्या दोन, २० रुपयांची एक तर १० रूपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा, सहा मोबाईल, सेलोटेप, कैची, एमएच १२ व्हीएफ ७७७५ क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असा एकुण १४ लाख ५८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिल्ड्रेन बँकेच्या ६१०० रुपयांच्या नोटांच्या बंडलावर खऱ्या नोटा चिटकवून फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते. मात्र, पोलीसांनी त्यांना वाटेतच जेरबंद केले.

याप्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे (३४ रा. बर्डे प्लॉट, खामगाव), मयुर किशार सिध्दपुरा (३४), विलास बाबुराव ठाकरे (३८) दोघेही रा. रा. अभय नगर,दंडेस्वामी मंदिराजवळ,खामगाव, लखन गोपाल बजाज  (३३, रा. दंडेस्वामी मंदिराजवळ) यांच्या विरोधात भादंवि कलम ४८९ ब, ४८९ क, ४८९ ई, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे, यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरुण परदेशी, एपीआय गोंदके, पीएसआय विनोद खांबलकर, निलसिंग चव्हाण, प्रविण गायकवाड, केशव झाटे, कैलास चव्हाण यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा