शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

अमेरीकन एक्सप्रेस बँकच्या चार खातेदारांना सात लाखांचा आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 2:07 PM

मोबाईल क्रमांक बदलून अकोल्यातील चौघांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

ठळक मुद्दे बँक खात्याच्या क्रेडीट कार्डचा रजिस्टर नंबर व खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक ‘हॅक’करून बदलला.चारही बँक खातेदारांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार रुपयांची आॅनलाईन खरेदी केली. सुरक्षा अधीकारी मिलींद रामचंद्र चव्हाण यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली.

अकोला - अमेरीकन एक्सप्रेस बँकेचे खातेदार असलेले तसेच क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्या चार जनांच्या क्रेडीट कार्डचा रजिस्टर नंबर व बँक खात्यासाठी दिलेला मोबाईल क्रमांक बदलून अकोल्यातील चौघांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी बँकेच्या अधिकाºयांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली होती.डाबकी रोडवरील आश्रय नगरातील रहिवासी प्रतिक सुभाषराव कराळे, पार्वती नगरातील रहिवासी विक्की गव्हाळे, अर्पीत यादव व सरस्वती नगर येथील रहिवासी तुळशीदास मारोती साबळे या चार जनांच्या टोळीने अमेरिकन एक्सप्रेस बँकेतील निरंजन मुखोपाध्याय, इकबालसिंग सौंद, गौतम खन्ना व अंशुमन बाफना यांच्या बँक खात्याच्या क्रेडीट कार्डचा रजिस्टर नंबर व खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक ‘हॅक’करून बदलला. त्यानंतर या चारही बँक खातेदारांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार रुपयांची आॅनलाईन खरेदी केली. या चार जनांमधील मुखोपाध्याय यांच्या खात्यातून २ लाख २ हजार रुपये, सौंद यांच्या बँक खात्यातून २ लाख १९ हजार, खन्ना यांच्या खात्यातून १ लाख १९ हजार आणि बाफना यांच्या खात्यातून २ लाख २४ हजार रुपयांची आॅनलाइन खरेदी केली. या चार जनांच्या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचेही समोर येत आहे. या टोळीने आॅनलाईन खरेदी करून लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे बँक अधिकाºयांच्या लक्षात येताच बँकेचे सुरक्षा अधीकारी मिलींद रामचंद्र चव्हाण यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली. त्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी या चार जनांविरुध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली होती.

 

टॅग्स :Akolaअकोलाcyber crimeसायबर क्राइम