शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरणी गोव्याचे माजी गृहमंत्री आणि त्यांच्या मुलाला क्लीन चीट; एसआयटीच्या अहवालात खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:29 IST

ड्रग्स माफियाशी संबंध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक या दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील तपासाच्या निष्कर्शावर ५० पानी अहवाल तयार केला आहे.

पणजी:  ड्रग्स माफियाशी संबंध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक या दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने या प्रकरणातील तपासाच्या निष्कर्शावर ५० पानी अहवाल तयार केला आहे. नाईक पिता पुत्रांचा अंमली पदार्थ प्रकरणाशी संबंध असल्याचे पुरावे नसल्याचा उल्लेख या अहवालात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीकडून बनविण्यात आलेला ५० पानी अहवाल पुढील आठवड्यात सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यासंबंधी निर्णय होणार आहे. निरीक्षक एड्वीन कुलासो या तपास पथकाचे प्रमुख आहेत व त्यांनीच हा अहवाल बनविला आहे. विशेष सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. २००९ च्या सुमारास राज्यात ड्रग माफिया, पोलीस आणि राजकारणी यांच्या कथित संबंधावरून वातावरण बरेच तापले होते. विधानसभेतही हा मुद्दा ताणून धरताना त्यावेळी विरोधात असलेले विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनतापक्षाच्या विधीमंडळ सदस्यांनी नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. तसेच २०१२ मध्ये भाजप सत्तेवर येताच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती नियुक्त केली होती. या समितीने केलेल्या अहवालात रवी नाईक व रॉय नाईक यांच्यावर ठपका ठेवला होता, परंतु अहवालावर सभागृह समितीचे इतर दोन्ही सदस्यांनी म्हणजेच मायकल लोबो आणि विष्णू वाघ यांनी स्वाक्षरी केली नव्हती. राज्य सरकारकडून या प्रकरणात तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त केली होती. एसआयटीकडून करण्यात आलेल्या तपासात दोघांनाही क्लीन चीट देण्यात आली.

टॅग्स :goaगोवा