शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते सर्व आरोपांतून दोषमुक्त

By राजेश भोस्तेकर | Updated: July 27, 2023 21:36 IST

उच्च न्यायालयाने दोषारोप केले रद्द, महेश मोहितेंना दिलासा

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगडचे भाजपचे माजी जिल्हाअध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप उच्च्य न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अ‍ॅड. मोहीते यांना दिलासा मिळाला आहे. एका महिलेने त्यांच्यावर शोषणाचे आरोप केले होते. यांनतर विरोधकांंनी त्याचे मोठे राजकारण झाले होते. अ‍ॅड. मोहिते यांचे हे प्रकरण मुंबई उच्च्य न्यायालयात सुरु होते. उच्च्य न्यायालयाचे न्या. गडकरी आणि न्या. दिघे यांच्या खंडपिठाने अ‍ॅड. मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप रद्द केले आहेत. अ‍ॅड महेश मोहिते यांची राजकिय कारकिर्द बहरत असताना, एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मोहिते याचे पहिले लग्न झाले असताना २०१५ साली माझ्याशी खोटे बोलून विवाह केला असल्याची तक्रार महिलेने सोलापूर येथे पोलीस ठाण्यात केली होती. तसेच तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार केली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात पक्षावर टीकेची झोड उठत आहे. यामुळे वरिष्ठांनी मोहिते याची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून राजीनामा घेतला आहे. मोहिते यांच्या या प्रकरणामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. महिलेने केलेल्या आरोपामुळे महेश मोहिते यांच्या आक्रमक राजकीय वाटचालीला ब्रेक लागला होता. मात्र सामाजिक कार्य सुरुच होते. मुरूड आणि रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या बल्क ड्रग पार्क विरोधात मोहिते यांचा लढा सुरुच ठेवला. अ‍ॅड. मोहिते यांनी शेतकर्‍याचा आवाज राज्य सरकार, राज्यपाल ते अगदी थेट दिल्लीपर्यंत पोहचविला होता. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा एकदा पक्षाच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी सोपवून विश्वास व्यक्त केला. आता न्यायालयानेही त्यांच्यावरील दोषारोप रद्द केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आलेले बालंट देखील आता दूर झाले आहे. अ‍ॅड. मोहिते यांच्यावरील दोषारोप उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मोहिते समर्थकांनी समाधान व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ऍड महेश मोहिते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागHigh Courtउच्च न्यायालय