शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहशत पसरवण्यासाठी चार ठिकाणी गोळीबार; तळेगाव दाभाडे येथील घटना : मावळात खळबळ

By नारायण बडगुजर | Updated: June 20, 2024 23:15 IST

तळेगाव दाभाडे येथे सहा जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे चेहऱ्याला मास्क लावून दुचाकीवरून फिरणाऱ्या सहा जणांनी चार ठिकाणी गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. २०) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. दीड महिन्यापूर्वी देखील गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा गोळीबार झाल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली. 

तळेगाव दाभाडे येथे सहा जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन चेहऱ्याला मास्क लावून फिरत होते. या टोळक्याने गणपती चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती चौक या चार ठिकाणी गोळीबार केला. शाळा चौक येथे त्यांनी दोन गोळ्या झाडल्या. उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तळेगाव दाभाडे येथे दाखल झाली. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली. त्यावरून टोळक्याचा माग काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

चोरट्यांनी केला होता गोळीबार...

तळेगाव दाभाडे येथे १० मे रोजी गोळीबार झाला होता. मस्करनेस कॉलनीतील एका बंगल्यात चोरी करण्यासाठी रेकी करत असलेल्या एकाला पोलिस उपनिरीक्षकाने हटकले. त्यावरून चोरट्याने थेट गोळीबार करत साथीदारासह पळ काढला.

दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. संशयीतांकडे चौकशी करण्याचे काम सुरू आहे. 

- देविदास घेवारे, सहायक पोलिस आयुक्त, देहूरोड विभाग 

टॅग्स :Firingगोळीबार