शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

व्हेल माशाच्या उलटी तस्करीतील सूत्रधाराचा बनाव उघडकीस

By शीतल पाटील | Updated: February 13, 2023 22:17 IST

सिंधुदुर्गमधून अटक, आतापर्यंत २४ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : व्हेल माशांच्या उलटी तस्करीतील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर (४२, रा. तळाशील, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याचा बनाव उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. सांगलीत साथीदारांना अटक होताच रेवणकर याने अंबरग्रीस समुद्र किनारी बेवारस सापडल्याचा बनाव करून चलाखीने मालवण पोलिसांना खोटी माहिती देऊन किनाऱ्यावरून जप्त करण्यास लावल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवस कोठडी सुनावली आहे.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करताना सांगलीत सलीम गुलाब पटेल (४९, रा. खणभाग), अकबर याकूब शेख (५१, रा. पिंगुळी, मुस्लीमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्याची किंमत पावणेसहा कोटी होती. पटेल व शेख यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी अकबर शेख याची कसून चौकशी केली. त्याने मुद्देमाल तळाशील (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील नीलेश रेवणकर याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप माने, उपनिरीक्षक विशाल येळेकर, महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथक अकबरला सोबत घेत सिंधुदुर्गकडे रवाना झाले.

तळाशील येथे पर्यटक म्हणून पथकाने वेशांतर करुन माहिती घेतली. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर यास शिताफीने पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच उर्वरित १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा व्हेल माशाची उलटी सदृश (अंबरग्रीस) मुद्देमाल समुद्रकिनारी टाकल्याचे सांगितले. सांगलीत साथीदारांना अटक होताच अंबरग्रीस समुद्रकिनारी बेवारस सापडल्याचा बनाव केला. त्याची माहिती मालवण पोलिसांना दिली. पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावरून मुद्देमाल जप्त केल्याची कबुली दिली.संदीप शिंदे व पथकाने तत्काळ मालवण पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्यातील उर्वरित १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १८ कोटी ६० किमतीचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ (अंबरग्रीस) मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह संशयित नीलेश याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमवारी नीलेशला न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख करीत आहेत.