शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यातील बोगस जमीन खरेदी-विक्री व्यवहार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:37 IST

एजंटचा सुुुळसुळाट : दुय्यम निबंधकांच्या सतर्कतेने प्रकार उजेडात

रोहा : रायगड जिल्ह्यातील चणेरा दिव गाव हद्दीतील शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरण समोर आहे. त्या प्रकरणातील सहभागी तत्कालीन अधिकारी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असतानाच बोगस जमीन खरेदी-विक्री व्यवहार अद्याप थांबतच नाहीत. याची प्रचिती गुरुवारी दुय्यम निबंधक कार्यालयात आली. जमीन मालकाचे बोगस ओळखपत्र तयार करून विक्री व्यवहार करणाऱ्या एजंटना दुय्यम निबंधक रोहा यांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात आले.

घोसाळे येथील गट नंबर ७१ च्या खरेदी-विक्री व्यवहारात रोह्याचे दुय्यम निबंधक ए.पी. बोरावके यांच्या सतर्कतेने विक्री करणाºया मालकाचे ओळखपत्र हे बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी बोगस मालक म्हणून उभ्या असलेल्या व्यक्तीने मला ४०० रुपये दिवसाच्या हजेरी रकमेवर येथे उभे केल्याचे कबूल केल्याने खळबळ उडाली. दिवसाच्या मजुरीवर बोगस व्यवहार एजंटमार्फत केले जात असल्याचे यावेळी समोर आले.या प्रकरणातील सर्व चार संशयितांना रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दस्त नोंदणीसाठी आल्यानंतर आधारकार्ड व पॅनकार्ड यांची खातरजमा केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले.रोहा तालुक्यात जमिनीचे बोगस व्यवहार होत आहेत. यात सरकारी अधिकारी सामील असून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मराठी माणसाला इस्रायली नागरिक म्हणून उभे करून व्यवहार करत आहेत, इतकी एजंटची मनमानी वाढल्याचे ग्राहक संरक्षण कक्षप्रमुख विजय बोरकर यांनी सांगितले. रजिशट्रेशन करताना प्रकरण उघडकीस आले आहे. मध्यस्थी वर्गाने त्रयस्थ व्यक्तीची जागा विकण्यासाठी चारशे रुपये मजुरी देऊन इस्राइलमध्ये जसा पेहराव असतो तसाच पेहराव करून दुय्यम निबंधकासमोर उभे केले.दरम्यान, एकीकडे चणेरातील शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरण गाजत असतानाच जमिनींचे बोगस खरेदी-विक्री व्यवहार होतातच कसे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.मूळ मालकाऐवजी बोगस व्यक्ती उभी करून जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार उघड झाले आहेत.