शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेला मारहाण करत लुबाडले, वांद्रे परिसरातील धक्कादायक प्रकार

By गौरी टेंबकर | Updated: September 19, 2022 17:59 IST

वांद्रे येथील रहिवासी असलेल्या ७८ वर्षीय महिलेवर गुरुवारी बँकेतून पैसे काढून घरी परतत असताना दोघांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली.

मुंबई : वांद्रे येथील रहिवासी असलेल्या ७८ वर्षीय महिलेवर गुरुवारी बँकेतून पैसे काढून घरी परतत असताना दोघांनी मारहाण करून लुटले. पीडित तुडी जोसेफ मॅथ्यूज यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला सेवानिवृत्त असून त्या त्यांचा मोठा भाऊ आणि दोन बहिणींसह वांद्रे पश्चिम येथील बोरान रोड येथे राहतात. १५ सप्टेंबर रोजी त्या हिल रोड येथील बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी बँकेतून १५ हजार रुपये काढले. नंतर सर्व पैसे पर्समध्ये ठेवले होते. त्या घरी जात असताना २० ते २५ वयोगटातील दोन व्यक्ती बँकेकडूनच तिचा पाठलाग करत होते. दरम्यान जेव्हा त्या नगरपालिकेच्या बागेत आल्या तेव्हा एका आरोपीने त्यांना पाठीमागून ढकलले आणि तिच्या चेहऱ्यावर जखम होऊन त्या जमिनीवर पडल्या.  त्यानंतर आणखी एका आरोपीने त्यांचे डोके जमिनीवर आपटले तर त्याच्या साथीदाराने पर्स हिसकावून त्यातील २५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली,” असे वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांनी सांगितले.

त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेने आपल्या भाचीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. ती आली आणि पीडित महिलेला भाभा रुग्णालयात घेऊन गेली. त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर सूज असल्याने त्यांचा एक्स-रे करण्यात आला, असे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी तिच्या भाचीसह वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले ज्यामध्ये आरोपीचे काही फुटेज सापडले असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी वांद्रे भागातील नसावे असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार पोलीस शहरातील मागील गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत. त्यानुसार लवकरच आरोपींना अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Robberyचोरी