शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या दुकलीला अटक, आरोपींकडून ९ गुन्ह्यांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2023 21:13 IST

पोलीस आयुक्तालयात विशेषत: वसई-विरार परिसरात वाहन व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

- मंगेश कराळे

नालासोपारा : मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १० मार्चला वाहन आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून ९ गुन्ह्यांची उकल करून चोरीचे ५ मोबाईल, ३ दुचाकी आणि १ रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शनिवारी जनसंपर्क अधिकारी सपोनि विशाल धायगुडे यांनी दिली आहे. 

पोलीस आयुक्तालयात विशेषत: वसई-विरार परिसरात वाहन व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी सूचना व मार्गदर्शन केले होते. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले. 

१० मार्चला गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त माहितीचे आधारे एक जण आचोळे रोड येथील सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स समोर येथे चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर ठिकाणी सापळा कारवाई करुन आरोपी गणेश अशोक पवार (२२) याला ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून ५ मोबाईल फोन हस्तगत केले.   याचबरोबर, एक जण चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी काशिमिरा, घोडबंदर येथील रिलायन्स पावर हाउसचे पाठीमागे येणार असल्याचे बातमी मिळाली. सदर ठिकाणी सापळा कारवाई करुन आरोपी कार्तिक प्रशात भुजे (२३) याला ताब्यात घेऊन त्याचेकडून ३ दुचाकी व १ रिक्षा अशी एकूण ४ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार अनिल नांगरे, जयकुमार राठोड, शिवाजी पाटील, राजाराम काळे, गोविंद केंन्द्रे, प्रविणराज पवार, राजबिर संधु, हनुमंत सूर्यवंशी यांनी केलेली आहे.

टॅग्स :Arrestअटक