शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 07:03 IST

एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत.

मुंबई : कार्डेलिया क्रुझ ड्रग्स पार्टीमुळे चर्चेत असलेल्या एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यांपासून ड्रग्जविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. एनसीबीने गेल्या १३ महिन्यात १०० कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. यात, ३०५ जणांवर अटकेची कारवाई केली आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्जप्रकरण समोर आल्यानंतर एनसीबीने तपास सुरू करत अंमली पदार्थ सेवनासह ड्रग्ज विक्री आणि तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत. यातील काही बडे मासे एनसीबीच्या गळालाही लागले. कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेटही उद्ध्वस्त केले. पुढे हा तपास बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेपर्यंत येऊन पोहोचला. एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख म्हणून वानखेडे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यापासून ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून  गेल्या वर्षी ४६ कारवाई करत १११ जणांना अटक केली. तर यावर्षी ९८ गुन्हे नोंदवत १९८ जणांना अटक केली.या कारवाईत आतापर्यंत कोडियन १०१.५ किलो, चरस ४१ किलो, हीरोइन ८ किलो, गांजा ३१८ किलो, इफेड्रिन १०.५ किलो, मेफेड्रोन १४ किलोसह विविध ९० ते १०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती एनसीबीने दिली. या कारवाई दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तस्करांच्या हल्ल्यालाही तोंड द्यावे लागले होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो