शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात धक्का लागल्याच्या रागातून थेट खून, आरोपी अटकेत

By सदानंद नाईक | Updated: March 2, 2023 19:14 IST

बुधवारी रात्री साडेबारा वाजता घडला प्रकार

सदानंद नाईक, उल्हासनगर: रस्त्याने जाणाऱ्याचा धक्का लागल्याच्या रागातून लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाचा खून केल्याचा प्रकार बुधवारी रात्री साडे बारा वाजता घडली. मध्यवर्ती पोलिसांनी काही तासातच सीसीटी टीव्ही फुटेज व तपासातून आरोपी अजय उर्फ अज्जू चौहान याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन येथून निरंजन यादव नावाचा इसम बुधवारी रात्री साडे बारा वाजता जात होता. त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या अज्जू उर्फ अजय चौहान याला धक्का लागला. धक्का लागल्यावरून दोघात तू तू मैं मैं झाली. त्यानंतर अजय चौहान याने लाकडी दांडके आणून मारहाण केली. मारहाणीत निरंजन यादव याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यात एक इसम निचपत पडल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन निचपत पडलेल्या इसमाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून निरंजन यादव याला मृत घोषित केले.

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटना घडली त्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस पथकद्वारे तपासून मारहाण करणाऱ्यांची परिसरात चौकशी केली. मारहाण करणाऱ्याचे नाव अज्जू उर्फ अजय चौहान असून तो फॉरवर्ड लाईन परीसरात राहत असल्याचे समजले. पोलिसांनी काही तासात अजय चौहान याला अटक करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तर मयत इसम निरंजन यादव हा शहरातील खेमानी परिसरात राहणारा असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर