शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट पुण्यात जेरबंद; ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी बीड पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:29 IST

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

ठळक मुद्दे १३ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी बीड जिल्ह्यात शुभकल्याणच्या संचालकांविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल फसवणुकीचा मराठवाड्यातील आकडा १०० कोटींच्या जवळपास आहे. 

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यामुळे बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी १३ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल दहा गुन्ह्यांचा तपास सुलभ होणार आहे. 

शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये ठेवीदारांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यात शुभकल्याणच्या संचालकांविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल असून, गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर मराठवाड्यातील हा आकडा १०० कोटींच्या जवळपास आहे. 

बीड जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. दरम्यान नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या २२ पैकी एक आरोपी शिवाजी भानुदास गिरी (लिपिक) यास आर्थिक गुुन्हे शाखेचे सपोनी विवेक पाटील यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कळंब येथे अटक केली होती. 

बीड तालुक्यातील वानगाव येथील मारुती बाबूराव जोगदंड या ठेवीदाराने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार जास्त व्याजाचे अमिष दाखवून फसवणूक करणे व एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. सुमारे २३ लाख २० हजार ४३० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २३ मार्च २०१८ रोजी २२ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला होता. यात संचालकांसह लिपिक व कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.आर्थिक गुन्हे शाखेने नेकनूरसह जिल्ह्यातील सर्वच प्रकरणांचा तपास सुरु केला होता. यातील एक आरोपी शिवाजी भानुदास गिरी याला दोन दिवसांपूर्वीच २३ आॅगस्ट रोजी कळंब येथे अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला. 

दिलीप आपेट हा शंभू महादेव साखर कारखान्याचा चेअरमन आहे. विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी दिला होता. उसाचे बील न मिळाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश होते. या संदर्भाने दिलीप आपेट पुण्यातील न्यायालयात येणार होता. दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले. आपेट याच्या अटकेबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उप अधीक्षक भास्करराव सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.